By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 08:46 IST
1 / 12चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच जिनपिंग सरकारचा तीळपापड झाला आहे. 2 / 12अमेरिकेने तैवानला पीएससी 3 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चीन पुरता भडकला आहे. 3 / 12चीनने अमेरिकेला एक चीन धोरणाचे पालन करण्याचा सल्लाही दिला आहे. खरं तर चीन तैवानला वन चायना पॉलिसीचा भाग समजतो, पण तैवान हे स्वतंत्र राष्ट्र असल्यानं त्यांनी चीनचा हा दावा कधीही स्वीकारलेला नाही. 4 / 12त्यामुळे चीन नेहमीच त्यांना धमकावत असतो. आजकाल चीन आणि तैवानमधील तणावही शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेनं तैवानला मदत करणं चीनला आवडलेलं नाही. 5 / 12तैवानला पीएससी 3 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा उपलब्ध करून देण्यास चीननं विरोध दर्शवलेला आहे. 6 / 12तैवानला पीएससी 3 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा उपलब्ध करून देण्यास चीननं विरोध दर्शवलेला आहे. 7 / 12चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी माध्यमांना सांगितले की, तैवानला शस्त्रे विकण्याच्या अमेरिकेच्या कृत्याचा चीन निषेध करतोय. अमेरिकेने वन चायना पॉलिसीचे पालन केले पाहिजे.8 / 12अमेरिकेच्या या निर्णयाचा बदला घेत चीनने अव्वल शस्त्रे बनविणारी कंपनी लॉकहीड मार्टिनवर बंदी घातली आहे. ही कंपनी तैवानला पीएससी 3 एअर डिफेन्स मिसाईल सिस्टमची विक्री करणार आहे. 9 / 12कंपनीवर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या संदर्भात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ म्हणाले की, चीनने या कराराविरुद्ध सर्व आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या कराराचे मुख्य कंत्राटदार लॉकहीड मार्टिन यांच्याविरुद्ध सर्व निर्बंध लादू शकतो.10 / 12अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानच्या पॅट्रियॉट ऍडवान्स्ड कॅपेबिलिटी(पीएसी-3) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची विनंती स्वीकारल्यानंतर चीननं त्यावर आक्षेप नोंदवलेला आहे. 11 / 12या शस्त्रास्त्राच्या खरेदीसाठी 62 दशलक्ष डॉलर्स खर्च होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन शस्त्रे कंपनीवर चीनने केलेली बंदी प्रतीकात्मक कारवाईशिवाय काहीच नाही. 12 / 12तज्ज्ञांनी सांगितले की, लॉकहीड मॉर्टिन कंपनी चीनमध्ये कोणतीही शस्त्रे विकत नाही, अशा परिस्थितीत बंदीमुळे कोणताही फरक पडणार नाही.