असा आहे व्लादिमीर पुतिन यांचा सिक्रेट राजमहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 20:57 IST2018-11-21T20:33:13+5:302018-11-21T20:57:17+5:30

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन त्यांच्या आक्रमक राजकारणाबरोबरच इतर अनेक कारणांमुळेही चर्चेत असतात. त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे पुतिन यांची शाही जीवनशैली
व्लादिमीर पुतीन यांचे रशियामध्ये अनेक महाल आहेत. मात्र पुतिन यांचा एक सिक्रेट राजमहाल कुठल्या स्वप्नमहालापेक्षा कमी नाही आहे. हा महाल व्हिला सेलग्रेन या नावाने ओळखला जातो.
गोल्ड प्लेटेड टाइल्सने सजवलेले स्वीमिंग पूल हे येथील आलिशानतेचे एक उदाहरण आहे.
माहितीनुसार पुतीन यांनी पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर या राजमहालाच्या पुनर्वांधणीस सुरुवात केली होती.
प्राप्त माहितीनुसार रशियन राज्यक्रांतीपूर्वी काही वर्षे आधी या महालाची बांधणी करण्यात आली होती.
हा महाल रशियाच्या सीमेपासून 12 किमी दूर असलेल्या एका बेटावर आहे.
या महालामध्ये पुतिन कधी राहण्यासाठी येतात, याबाबत कुणालाही नेमकी माहिती नाही.
या महालामध्ये येण्याची कुणालाही परवानगी नाही. तसेच येथील सुरक्षेसाठी रशियाची फेडरल प्रोटेक्शन सर्विस कायम तैनात असते.
या महालामधून दिसणारे एक सुंदर दृश्य.