1 / 12जगाच्या इतिहासात आतापर्यंत शेकडो लढाया आणि युद्ध लढली गेली आहेत. मात्र आज आपण चर्चा करत असलेले युद्ध सर्वार्थाने वेगळे होते. ५ ते ११ जून १९६७ असे अवघे सहा दिवस चाललेल्या या युद्धाने मध्यपूर्व आशियाचा नकाशा बदलला होता. 2 / 12हे युद्ध लढले गेले होते इस्राईल विरुद्ध इजिप्त आणि इतर अरब राष्ट्रांमध्ये. ५ जून १९६७ रोजी युद्धाला तोंड फुटल्यावर इस्राईलने इजिप्तमधील कैरोजवळच्या आणि स्वेजच्या वाळवंटात असलेल्या इजिप्तच्या हवाई तळांवर जोरदार हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इजिप्तची बहुतांश सर्वच विमाने उद्ध्वस्त करत इस्राईलने इजिप्तच्या हवाई क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. 3 / 12इस्राईलमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.२४ च्या सुमारास इजिप्तच्या विमानांनी हल्ला केल्याचे वृत्त आले होते. मात्र या युद्धाची सुरुवात इस्राईलच्या हवाई दलाने केल्याचे इतिहासकार सांगतात. 4 / 12दुसरीकडे इजिप्तमध्ये सकाळी ८.१२ वाजता सरकारी रेडिओवरून घोषणा झाली की, इस्राईली सैन्याने आज सकाळी हल्ला केला. त्यानंतर आपली विमाने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी गेली. कैरोचा विमानतळ बंद करण्यात आला असून, देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. 5 / 12दरम्यान १० च्या सुमारास सीरियानेदेखील आपण इस्राईलच्या ठिकाणांवर विमानांमधून बॉम्बहल्ला केल्याची घोषित केले. त्यानंतर इराक, कुवेत, सुदान, अल्जिरिया, येमेन आणि सौदी अरेबिया या देशांनीही युद्धात उडी घेतली. 6 / 12जेरुसलेममधील इस्राईली आणि जॉर्डेनियन भागांमध्ये रस्त्यावर लढाया सुरू झाल्या. दरम्यान, सीरियाने हैफा शहरावर हल्ला केला. तर इस्राईलने दमिश्क विमानतळाला लक्ष्य केले. 7 / 12या युद्धात आपलाच विजय होईल, असा इस्राईल आणि इजिप्तला विश्वास होता. अरब राष्ट्रांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. मात्र या युद्धाबाबत जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत होती. पोप पॉल सहावे यांनी तर जेरुसलेमला मुक्त शहर घोषित करण्याची मागणी केली होती. 8 / 12इस्राईली सैनिकांनी गाझाच्या सीमेवरील शहर असलेल्या खान युनिस आणि तिथे असलेल्या सर्व इजिप्शियन आणि पँलेस्टिनी सैन्यावर कब्जा केला. 9 / 12दरम्यान, युद्धाच्या पहिल्या दिवशी मध्यरात्रीच इस्राइलने इजिप्तच्या हवाई दलाला उद्ध्वस्त करण्यात आल्याची घोषणा केली. युद्धाच्या पहिल्याच दिवशी 400 विमाने पाडण्यात आली. त्यामध्ये इजिप्तची ३०० तर सीरियाची ५० विमाने नष्ट झाली. अशा प्रकारे पहिल्या दिवशीच्या लढाईत इस्राईलचा दबदबा राहिला.10 / 12त्याच रात्री इस्राईली संसद नेसेटच्या बैठकीत इस्राईलचे पंतप्रधान लेविस एशकोल यांनी सांगितले की, आता संपूर्ण युद्ध इजिप्त आणि सिनाई द्विपकल्पात सुरू आहे. तसेच या युद्धात इजिप्त, जॉर्डन आणि सीरियाच्या सैन्याला जबर नुकसान पोहोचवण्यात आले आहे.11 / 12उणेपुरे सहा दिवस चाललेले हे युद्ध अखेर ११ जूनला युद्धविरामाच्या करारावर सह्या करून संपले. मात्र या युद्धात विजय मिळवून इस्राइलने जगाला आश्चर्याचा धक्का दिला. या सहा दिवसांच्या युद्धात इस्राईलने हजारांहून कमी सैनिक गमावले. तर अरब राष्ट्रांचे सुमारे २० हजार सैनिक मारले गेले. 12 / 12या युद्धादरम्यान इस्राइलने इजिप्तच्या ताब्यातील गाझापट्टी आणि सिनाई द्विपकल्पावर कब्जा केला तर जॉर्डनच्या ताब्यातील वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि सीरियाच्या ताब्यातील गोलन हाईटच्या पर्वतरांगा हिसकावून घेतल्या. सद्यस्थितीत सिनाई द्विपकल्प इजिप्तच्या ताब्यात आहे. तर वेस्ट बँक आणि गाझापट्टी पँलेस्टाईनी भाग आहेत. जिथे पँलेस्टिनी राष्ट्र बनवण्याची मागणी होत आहे.