तमाम जगाला खुदकन हसवणाऱ्या 'स्माइली'च्या जन्माची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 16:11 IST2018-07-10T15:46:22+5:302018-07-10T16:11:04+5:30

सोशल मीडियावर एखाद्याशी बोलताना तुम्ही स्माईली वापरत असता. पण तुम्हाला माहित आहेत का याचा शोध कोणी लावला.
तुम्ही वापरत असलेल्या स्माईलाचा शोध अमेरिकातील हार्वी रोस बॉल यांनी लावला आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे.
ज्यावेळी त्यांनी स्माईली फेस तयार केला त्यावेळी येवढा प्रसिद्ध होईल याचा त्यांना आदांज नसेल. याचा त्यांनी पेटेंटही केला नाही.
न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, 1963मध्ये हार्वी रोस बॉल जनसंपर्क आणि जाहिरात मध्ये काम करत होते.
त्यावेळी त्यांच्यासमोर कामगारांनी अडचण उभा केली त्यावेळी त्यांनी स्माईलीचा शोध लावला
दुसऱ्या एका कंपनीबरोर त्यांनी टायप केल्यामुळे कामकार नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रॉस यांनी स्माईलीची शक्कल लढवली होती.
आज जगभरात सर्वच जण स्माईलीचा वापर करतात
लहानापासून मोठ्यापर्यंत याचा वापर सर्सास केला जातोय....