धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:29 IST2025-07-16T13:08:42+5:302025-07-16T13:29:59+5:30
दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे...

भारत आणि अमेरिका यांच्यात ट्रेड डील अथवा व्यापार करारासंदर्भात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र आता त्यात काहीसा अडथळा येताना दिसत आहे.
इंडिया टुडेच्य एका वृत्तानुसार, अमेरिकेला आपले डेअरी प्रॉडक्ट्स भारतात पाठवायचे आहेत. मात्र, भारताने याला स्पष्ट नकार दिला आहे. कारण यात, गायीचे मांसाहारी दूध पाठवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. डेअरी प्रॉडक्ट्ससाठी प्रमाणपत्र लागेल, असे भारताचे म्हणणे आहे.
दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत दुग्ध क्षेत्राचा वाटा ३ टक्क्यांपर्यंत आहे. याचे एकूण मूल्य सुमारे ९ लाख कोटी रुपये एवढे आहे.
एसबीआयच्या मते, अमेरिकेने दुग्ध क्षेत्राशी संबंधित वस्तू पाठवायला सुरुवात केली, तर भारताला दरवर्षी १.०३ लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. याशिवाय, अमेरिकेला नकार देताना भारताने धार्मिक भावनांचाही हवाला दिला आहे.
नेमकं काय असतं गायीचं मांसाहारी दूध - खरे तर, भारतात गायींना खाद्य म्हणून चारा आणि गवत दिले जाते. याशिवाय इतरही काही नैसर्गिक गोष्टी दिल्या जातात. मात्र, अमेरिकेत या सर्वांची मोठी कमतरता आहे...
...यामुळे अमेरिकेत गायींना स्वस्त प्रोटिन्सच्या स्वरुपात चाऱ्यातून डुक्कर, कोंबडी, मासे अथवा घोड्याची चरबी दिली जाते. म्हणूनच भारताने अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांना नकार दिला आहे. दरम्यान, यामुळे व्यापार करारात अनावश्यक अडथळा येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
भारतासोबतच्या ट्रेड डीलसंदर्भात काय म्हणाले ट्रम्प - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ट्रेड डीलसंदर्भात भारतासोबत सातत्याने चर्चा सुरू आहे. आम्ही भारतासोबतही इंडोनेशिया प्रमाणेच डील करणार. इंडोनेशियामध्ये कॉपर सेक्टर प्रचंड मजबूत आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, त्यांना कुठल्याही टॅरिफ शिवाय, इंडोनेशियामध्ये प्रवेश मिळेल.