By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:16 IST
1 / 8या ऐतिहासिक व्यापार करारामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळला असून, याचे श्रेय भारतात नुकतेच दाखल झालेले अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांना दिले जात आहे.2 / 8एप्रिल महिन्यात अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लादला होता. त्यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त २५ टक्के पेनल्टी लादण्यात आली होती. यामुळे भारताला एकूण ५० टक्के टॅरिफचा फटका बसत होता. मात्र, ट्रम्प यांनी आता हा टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत खाली आणत दोन्ही देशांमधील व्यापार करार निश्चित केला आहे.3 / 8जानेवारी महिन्यात नवी दिल्लीत दाखल झालेले सर्जियो गोर हे ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांना मेयर ऑफ मार-ए-लागो या नावानेही ओळखले जाते. ते पूर्वी डीजे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या दूतावासातील पहिल्याच कार्यक्रमात चक्क गन्स एन रोझेस आणि मेटालिका सारख्या रॉक बँड्सचे संगीत वाजले होते.4 / 8'खरे मित्र एकमेकांशी असहमत असू शकतात, पण शेवटी ते आपले वाद सोडवतातच,' हे त्यांचे शब्द आज खरे ठरले आहेत. राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत त्यांनी भारताला दिलासा मिळवून दिला.5 / 8ट्रम्प यांचे अनेक सहकारी रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर जहरी टीका करत असताना, गोर यांनी मात्र नेहमीच मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीवर भर दिला. ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली तेव्हा त्यांनी ट्रम्प यांनी सही केलेला एक फोटो मोदींना भेट दिला, ज्यावर लिहिले होते - 'मिस्टर प्राईम मिनिस्टर, यू आर ग्रेट.' 6 / 8त्यांनी भारताला पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले, जे एआय आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सप्लाय चेनसाठी ट्रम्प यांचे महत्त्वाचे पाऊल आहे. ४व्यापार आणि टॅरिफच्या वादात भारतासाठी महत्त्वाचा असलेला दहशतवाद हा मुद्दा बाजूला पडणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.7 / 8सर्जियो गोर यांनी ट्रम्प यांच्या २०२४ च्या मोहिमेसाठी लाखो डॉलर्सचा निधी गोळा केला होता. ट्रम्प यांच्या इनर सर्कलमध्ये त्यांचे वजन मोठे असल्याने, त्यांनी भारताची बाजू राष्ट्राध्यक्षांपर्यंत प्रभावीपणे मांडली. ट्रम्प यांनीही गोर यांचा उल्लेख पूर्ण विश्वासार्ह व्यक्ती असा केला आहे.8 / 8या व्यापार करारामुळे रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल लावण्यात आलेला अतिरिक्त दंडही हटवण्यात आला असल्याचे गोर यांनी स्पष्ट केले आहे. गोर यांच्या केवळ एक महिन्याच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध सुधारण्यास मदत झाली.