लग्नासाठी मागितलं स्वातंत्र्य; सरकारनं दिला 'क्रूर' झटका! भयानक आहे सौदीतील महिलांचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 09:55 PM2020-06-01T21:55:04+5:302020-06-01T22:16:19+5:30

सौदीत महिलांना त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय लग्न करण्याचे स्वातंत्र्य नाही.

महिलांना मुक्तपणे विवाह करण्याचा अधिकार देण्यासाठी महिला परिषद परिषदेनं एक प्रस्ताव ठेवला होता, तो प्रस्ताव सौदी अरेबियाच्या न्याय समितीच्या शुरा कौन्सिलने फेटाळून लावला आहे.

त्यामुळे आता पुरुष पालकांच्या परवानगीशिवाय महिलांना लग्न करता येणार नाही.

अल रियाधच्या अहवालानुसार, इक्बाल दरंदारी यांनी आपल्या प्रस्तावात न्याय कायदा मंत्रालयानं कायद्यात आवश्यक सुधारणा करावी आणि महिलांना मुक्तपणे लग्न करण्याची परवानगी द्यावी, असे मुद्दे मांडले होते.

त्यानंतर न्याय समितीच्या शूरा कौन्सिलने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पुरुष पालकांची उपस्थिती ही वैवाहिक कायद्यासाठी आवश्यक अट आहे.

सौदीच्या प्रथागत कायद्यानुसार कोणत्याही स्त्रीकडे लग्नाच्या वेळी आपल्या पुरुष संरक्षकाशी सहमती असणे आवश्यक आहे.

न्यायालयीन समितीने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देताना अल रियाधने हा प्रस्ताव फेटाळल्याचं सांगितलं आहे.

'दरंदारी यांनी आपला प्रस्ताव मागे घेतला आहे, तर परिषदेच्या इतर सदस्यांनीही घटस्फोटाशी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीवर पाठ फिरविली आहे.

सौदी अरेबियामध्ये पुरुष संरक्षणात्मक यंत्रणेमुळे महिलांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याची चर्चा आहे. मानवाधिकारानुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत येथे स्त्रीचे संपूर्ण आयुष्य पुरुषाच्या नियंत्रणाखाली असते.

सौदी अरेबियामधील प्रत्येक महिलेस कायदेशीररीत्या एका पुरुष पालकांची आवश्यकता असते, जे बहुतेक वेळा मुलीचे वडील, पती किंवा भाऊ असतो.

महिलांच्या या पालकांमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्ती असते. तसेच महिलाही या पालकांच्या सहमतीशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत.

सौदीत महिलांना त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय लग्न करण्याचे स्वातंत्र्य नाही.

एका अहवालानुसार या प्रस्तावावर विचार करणे अधिक महत्वाचे झाले आहे. हे देशाची प्रतिमा सुधारेल आणि मानवी हक्कांचे संरक्षण करेल.