शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia Ukraine Attack: युक्रेनवर महाविनाशकारी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकण्याची रशियाची तयारी! ब्रिटनच्या दाव्यान खळबळ उडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 5:33 PM

1 / 9
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती असून सुमारे दोन लाख रशियन सैनिकांनी युक्रेनला गराडा घातला आहे. एवढेच नाही, तर रशियाने आपल्या सैन्याला हल्ल्यासाठीही तयार केले असल्याचे नुकत्याच मिळालेल्या सॅटेलाइट इमेजेसमध्येही दिसून आले आहे.
2 / 9
यातच, रशिया 'फादर ऑफ ऑल बॉम्ब'ने हल्ल्याची सुरूवात करू शकतो, असा दावा ब्रिटिश संरक्षण सूत्रांनी केला आहे. रशियाचा हा बॉम्ब अणुबॉम्बनंतर जगातील सर्वात शक्तिशाली नॉन-न्यूक्लियर बॉम्ब मानला जातो. या बॉम्बच्या स्फोटामुळे 44 टन टीएनटीच्या बरोबरीचा स्फोट होतो.
3 / 9
ब्रिटीश वृत्तपत्र मिररने ब्रिटिश संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशियन राष्ट्रपतींनी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब्स' डागण्यास मंजुरी दिली आहे. हा रशियाचा दहशत निर्माण करण्याच्या रणनीतीचा भाग आहे.
4 / 9
हा महा-विध्वंसक बॉम्ब एखाद्या लढाऊ विमानातून टाकला जाऊ शकतो. या बॉम्बचा हवेतच ब्लास्ट होतो आणि अगदी लहान अणुबॉम्ब टाकल्याप्रमाणेच विनाश घडवतो. महत्वाचे म्हणजे, हवा आणि ईंधन यांच्या संयोगाने तो आणखी भयंकर होतो.
5 / 9
तज्ज्ञांच्या मते, हा बॉम्ब टाकल्यानंतर, सुपरसॉनिक वेव्ह निर्माण होतात. या बॉम्बच्या स्फोटामुळे एवढी प्रचंड ऊर्जा आणि उष्णता बाहेर पडते की, त्याच्या टप्प्यात येणाऱ्या परिसरात वाफेसारखी स्थिती निर्माण होते.
6 / 9
रशियाने सीरियावर टाकला होता हा बॉम्ब! - ब्रिटिश सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतीन यूक्रेनच्या नागरिकांमधील लढण्याच्या धाडसाचे खच्चीकरण करण्यासाठी 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' टाकू युद्धाची सुरुवात करू शकतात. रशियाने हा बॉम्ब सीरियावर टाकला होता, असे बोलले जाते.
7 / 9
रशियानं 2007 मध्ये तयार केलाय फादर ऑफ ऑल बॉम्ब - संरक्षण सूत्रांनी म्हटल्या प्रमाणे, 'या बॉम्बचा परिणाम अत्यंत भयानक असेल. यामुळे मोठ्या संख्येने लोक मारले जातील आणि टँकदेखील नष्ट होतील. सीएनएनच्या मते, फादर ऑफ ऑल बॉम्ब, अमेरिकेच्या मदर ऑफ ऑल बॉम्बच्या तुलनेत 4 पट अधिक शक्तिशाली आहे. रशियाने 2007 मध्ये हा बॉम्ब विकसित केले आहे.
8 / 9
फादर ऑफ ऑल बॉम्बमुळे झालेला विध्वंस जवळपास अणुबॉम्बसारखाच असतो. मात्र, यामुळे रेडिएशनचा धोका नाही. हा बॉम्ब सध्या केवळ रशियाकडेच आहे. हा बॉम्ब टाकल्यानंतर तो हवेतच फुटतो. 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' स्फोटानंतर 44 टन ऊर्जा निर्माण करतो तर मदर ऑफ ऑल बॉम्ब स्फोटानंतर 11 टन ऊर्जा निर्माण करतो.
9 / 9
'फादर ऑफ ऑल बॉम्ब'चे वजन 7 हजार 100 किलो एवढे आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानवर नॉन-न्यूक्लियर बॉम्ब टाकला तेव्हा त्यामुळे जमिनीला 1000 फुटांपर्यंत खोल खड्डा पडला होता आणि जवळपासचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला होता. रशियाचा बॉम्ब अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने अधिक विनाश घडवू शकतो.
टॅग्स :russiaरशियाAmericaअमेरिकाBombsस्फोटकेwarयुद्ध