या बँकेत रोबो करतात कर्मचाऱ्यांचे काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 20:21 IST2018-08-22T20:07:36+5:302018-08-22T20:21:52+5:30

चीनमधील शांघाई शहरात अशी आगळीवेगळी बँक सुरू करण्यात आली आहे जिथे चक्क रोबो बँक कर्मचाऱ्यांचे काम करतात.
सीसीबी अर्थात चायना कन्स्ट्रक्शन बँकेची ही शाखा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फेस रिकग्नेशन आणि व्हर्चुअल रिअॅलिटीवर अवलंबून आहे.
या बँकेतील रोबो ग्राहकांशी संवाद साधू शकतात. तसेच त्यांच्यातील विशिष्ट्य प्रणालीमुळे हे रोबो ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरेही देऊ शकतात.
येथील रोबो ग्राहकांचे खाते उघडण्यापासून ते चलनाची देवाणघेवाण करण्यापर्यंतची सर्व कामे करतात.