शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१२ वर्षाच्या मुलांना सेक्ससाठी या देशात सहमती देण्याचा अधिकार, आता बदलतोय कायदा 

By पूनम अपराज | Published: January 19, 2021 8:20 PM

1 / 6
बाल अधिकारांसाठी काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, सेक्ससाठी सहमती देण्याचे वय आणि मुलांसोबत लैंगिक शोषणादरम्यान कनेक्शन सापडले आहे. बऱ्याच दशकांपासून मागणी केल्यानंतर फिलिपिन्समध्ये सेक्ससाठी सहमतीने वय बदल्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. (all photos - Getty)
2 / 6
अर्थशास्त्रज्ञांच्या अहवालानुसार, फिलिपिन्समध्ये वयस्कर महिलांच्या तुलनेत लहान मुलांवर बलात्कार झाल्याच्या घटना अधिक प्रमाणावर नोंदवण्यात आल्या आहेत. प्रत्येकी पाच केसेसमध्ये एक बाल लैंगिक शोषणाची तक्रार आहे. कोरोना लॉकडाऊनदरम्यान ल्हग्यांसोबत ऑनलाईन लैंगिक शोषणाच्या घटना देखील घडल्या आहेत. 
3 / 6
फिलिपिन्स हा खूप धार्मिक देश आहे आणि बहुतांश लोकसंख्या कॅथॉलिक आहे. वैटीकननंतर फिलिपिन्स हा जगातील एकमेव देश आहे, जेथे घटस्फोट अवैध आहे(मुस्लिम समाज वगळून)
4 / 6
लहान मुलांचे अधिकार मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या संघटनांचे असे म्हणणे आहे की, सेक्ससाठी सहमतीचे वय वाढवल्याने गुन्हेगारी प्रकरणात कारवाई करणं सोपं होईल. लहान मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी बलात्काराचा खटला चालवला जाऊ शकतो 
5 / 6
बऱ्याच शतकांपासून कायदा बदल्याची मागणी फेटाळण्यात आली. त्यानंतर डिसेंबरमध्ये फिलिपिन्सच्या संसदेत खालच्या परिषदेत सहमतीने वय १६ करण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आले. आता याच्याशी संबंधित विधेयकास वरच्या परिषदेत सादर केले जाईल 
6 / 6
आशा आहे की, उच्च स्थरीय परिषदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर फिलिपिन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो डुटेट्रे या विधेयकास मंजुरी देतील.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनPresidentराष्ट्राध्यक्षSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळInternationalआंतरराष्ट्रीय