PrayForBeirut: बेरुतमधील स्फोटानंतरची भीषण क्षणचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 11:43 PM2020-08-04T23:43:04+5:302020-08-05T00:18:32+5:30

लेबनानची राजधानी बेरुत येथे मंगळवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत.

दुपारच्या वेळेला झालेल्या स्फोटात राजधानीमधील अनेक भाग हादरले तर संपूर्ण आकाशात काळा धूर पसरला होता.

स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा स्फोट इतका तीव्र होता की, घराच्या खिडक्या, फॉल्स सिलिंग तुटल्या. बेरुतच्या पत्तननजीक हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.

बेरुत पत्तननजीक असोसिएसट प्रेसच्या एका फोटोग्राफरने जखमी लोक रस्त्यावर पडल्याचं पाहिलं. बेरुतमध्ये स्फोटाने प्रचंड हाहाकार माजला होता.

हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत.

लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. माझ्या शरीरातून रक्त वाहत आहे.

हा स्फोट इतका भयंकर होता की, काही लोकांनी अणुबॉम्बचा स्फोट झाल्याचं सांगत होते. मात्र अद्याप या स्फोटाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

एका ट्विटर युजर्सने या स्फोटाची तुलना करताना हिरोशिमा आणि नागासाकी स्फोटाची आठवण व्यक्त केली आहे

या स्फोटात लेबानन कतीब पक्षाचे महासचिव नजर नजारियन यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, येथील फटाक्यांचा साठा असलेल्या गोदामाला आग लागल्याने हा स्फोट झाल्याची माहिती तेथील उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या स्फोटानंतरची क्षणचित्रे ही अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. या स्फोटात शहरातील तो भाग संपूर्णपणे उध्वस्त झाल्याचं दिसतंय

धुराचे लोट, जाळ आणि आगीत भस्मसात झालेली घरे,कार्यालये आणि गाड्यांचे फोटो पाहून मन भावनाविवश होते

या स्फोटात आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

स्फोटातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.

स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केलंय

या स्फोटानंतर ट्विटरवर pray for beirut हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे

Read in English