शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मॅक्सिकोत शक्तिशाली भूकंप, 200 हून अधिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 10:44 PM

1 / 8
मॅक्सिको देशाची राजधानी मॅक्सिको सिटी बुधवारी शक्तिशाली भूकंपानं हादरली.
2 / 8
या भूकंपात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
3 / 8
भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली आहे. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पूएब्ला प्रांतामध्ये होता.
4 / 8
या भूकंपाच्या दुर्घटनेनंतर मॅक्सिकोमधील लोक रस्त्यावर उतरून सैरावैरा पळत होते.
5 / 8
मॅक्सिकोचे राष्ट्रपती पेना निएटो यांनीही भूकंपाच्या दुर्घटनेत मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे.
6 / 8
या भूकंपात जवळपास 27 इमारती कोसळल्याही माहितीही राष्ट्रपती पेना निएटो यांनी दिली आहे.
7 / 8
भूकंपानंतर मॅक्सिको सिटी विमानतळावरून विमानांचं उड्डाण रोखण्यात आलं. दोन आठवड्यांपूर्वीच मॅक्सिकोच्या दक्षिणेकडच्या भागात झालेल्या भूकंपात 90 लोकांचा मृत्यू झाला होता.
8 / 8
मॅक्सिकोमध्ये 1985 सालानंतर आलेला सर्वात विध्वंसकारी भूकंप आहे.