PM मोदी रमले एलन मस्क यांच्या मुलांमध्ये, बैठकीमध्ये कोण-कोण होतं?; पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:44 IST2025-02-14T09:40:41+5:302025-02-14T09:44:41+5:30

PM Modi Meets Elon Musk Family: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यात स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एलन मस्क यांच्या मुलांसोबतही वेळ घालवला.

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली. या भेटीसाठी एलन मस्क त्यांची पत्नी आणि तीन मुलांना सोबत घेऊन आले होते. यावेळी मोदींनी मस्क यांच्या मुलांसोबत वेळ घालवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलन मस्क यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो एक्सवर शेअर केले आहेत. या भेटीत एलन मस्क यांच्यासोबत पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. मस्क यांच्या कुटुंबासोबतची भेट आणि विविध विषयांवर चर्चा करणे आनंददायी होते, असे मोदी म्हणाले.

"वॉशिंग्टन डीसीमध्ये एलन मस्क यांच्यासोबत भेट झाली. आम्ही विविध विषयांवर चर्चा केली, यात त्या मुद्द्यांचाही समावेश होता, त्याबद्दल त्यांना आवड आहे. जसे अंतराळ, मोबिलिटी, संशोधन", असे मोदींनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी एलन मस्क यांच्या मुलांसोबतही वेळ घालवला. मोदी यांनी त्यांच्या मुलांना गिफ्टही दिले.

एलन मस्क यांचा मुलगा नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या भेटीसाठीही मस्क मुलाला घेऊन गेले होते. मोदींसोबतच्या भेटीवेळी मस्क यांची पत्नी शिवोन जिलिस याही उपस्थित होत्या.