'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूग हेफनर यांचं 91व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 00:09 IST2017-09-29T00:03:45+5:302017-09-29T00:09:41+5:30

प्रसिद्ध अॅडल्ट मॅगझिन 'प्लेबॉय'चे संस्थापक ह्यूग हेफनर यांचं निधन झालं आहे.
91 वर्षीय ह्यू हफनर यांनी बुधवारी रात्री अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला.
प्लेबॉय एंटरप्रायजेसने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून याबद्दलची माहिती दिली आहे.
ह्यूग हेफनर यांनी 1960च्या दशकात सेक्स आणि लैगिक विषयांबद्दलच्या पारंपरिक विचारांची असणारी चौकट मोडून काढली. पुरूषांसाठी तयार केलेल्या खास मासिकातून त्यांनी या नव्या जीवनशैलीबद्दल सांगायला सुरूवात केली.
मासिकाच्या बळावर त्यांनी स्वतःचं एक व्यवसाय साम्राज्य तयार केलं होतं. ह्यूग हेफनर हे हेफ या नावानेही ओळखले जात होते.