शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Planet Killer Asteroid: सूर्याच्या प्रकाशात लपलेला सर्वात मोठा लघुग्रह; पृथ्वीवर धडकणार, पण...शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2022 8:30 PM

1 / 5
Planet Killer Asteroid: अंतराळात अनेक महाकाय उल्कापिंड/लघुग्रह फिरत असतात. यातील काहींचा पृथ्वीला धोका असल्याचे म्हटले जाते. अशाच एका महाकाल उल्कापिंडाचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. हा महाकाय उल्कापिंड सूर्याच्या तीव्र प्रकाशात लपलेला होता. हा उल्कापिंड 1.5 किलोमीटर रुंद असून, गेल्या आठ वर्षांत दिसलेल्या उल्कापिंडांपैकी सर्वात मोठा आहे. भविष्यात हा उल्का पृथ्वीवर धडकू शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. हा पृथ्वीवर कधी धडकेल, हे सांगता येत नाही. मात्र, शास्त्रज्ञांनी याला 'प्लॅनेट किलर' असे नाव दिले आहे.
2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, या लघुग्रहाचे/उल्कापिंडाचे नाव 2022 AP7 आहे. पृथ्वी आणि शुक्र यांच्या दरम्यानच्या भागात हा उल्का प्रदक्षिणा घालत असल्याने, त्याचा शोध फार काळ लागू शकला नाही. या प्रदेशात लघुग्रह शोधण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांना सूर्याच्या दिशेने पहावे लागते. सूर्याच्या प्रखर तेजामुळे तिथे जाणे किंवा तिथले दृष्य दिसणे फार कठीण आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप आणि हबल स्पेस टेलीस्कोप यासारख्या प्रमुख दुर्बिणीदेखील सूर्याकडे पाहू शकत नाहीत. कारण सूर्याची चमक टेलिस्कोपच्या लेन्स आणि ऑप्टिक्सवर परिणाम करू शकतात.
3 / 5
या कारणास्तव, खगोलशास्त्रज्ञांना या प्रदेशात लपलेल्या लघुग्रहाबद्दल फारच कमी माहिती आहे. अशा स्थितीत कधी कधी अचानक एखादा लघुग्रह दिसतो. स्कॉट एस. शेपर्ड, कार्नेगी इन्स्टिट्यूशन फॉर सायन्स अँड प्लॅनेट्स लॅबोरेटरीच्या पृथ्वी आणि ग्रह प्रयोगशाळेतील खगोलशास्त्रज्ञ आणि संशोधनाचे लेखक म्हणतात की आतापर्यंत फक्त 25 लघुग्रह शोधले गेले आहेत.
4 / 5
2013 मध्ये केवळ 66 फूट रुंद असलेला एक अतिशय छोटा लघुग्रह सूर्यापासून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पृथ्वीवर आदळला होता. त्या लघुग्रहाचा आग्नेय रशियातील चेल्याबिन्स्क शहरावर स्फोट झाला होता. त्याच्या स्फोटाने हजारो इमारतींच्या खिडक्या फुटल्या होत्या. शास्त्रज्ञांच्या मते, 2022 AP7 पृथ्वीशी टक्कर झाल्यास, तो चेल्याबिन्स्कपेक्षा कितीतरी जास्त हानिकारक असेल. तो पृथ्वीवर कधी आदळणार याचा अंदाज शास्त्रज्ञांनी अद्याप लावला नसला तरी भविष्यात हा लघुग्रह पृथ्वीवर धडकू शकतो, हे मात्र निश्चित.
5 / 5
चिलीमधील सेरो टोलोलो इंटर-अमेरिकन वेधशाळेतील अतिसंवेदनशील डार्क एनर्जी कॅमेरा (डीईसी) ने हा लघुग्रह शोधला. हा कॅमेरा संध्याकाळच्या वेळी संपूर्ण आकाश स्कॅन करतो. या काळात, हा लघुग्रह दररोज 10 मिनिटांच्या कालावधीत दिसू शकतो. या लघुग्रहाशिवाय खगोलशास्त्रज्ञांनी आणखी दोन लहान लघुग्रह शोधले आहेत, त्यापैकी एक सूर्याच्या सर्वात जवळ आहे. त्याचे नाव 2021 PH27 आहे. याशिवाय दुसऱ्या लघुग्रहाचे नाव 2021 LJ4 आहे. या दोन्ही लघुग्रहांचा पृथ्वीला धोका नाही.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सNASAनासा