पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:47 IST
1 / 10पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच अफगाणिस्तान आणि भारताला धमकी दिली आहे. जर अफगाणिस्तानसोबत शांतता चर्चा अयशस्वी ठरली तर पाकिस्तान खुल्या युद्धाला तयार आहे असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय तालिबान भारताचा एजेंट म्हणून काम करत आहे. भारत पाकिस्तानला दोन्ही आघाड्यांवर व्यस्त ठेवू इच्छितो असा दावाही पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.2 / 10पाकिस्तानी संरक्षण मंत्री आसिफ यांच्या या विधानामुळे पाकिस्तान खरेच २ आघाड्यांवर युद्ध लढण्याची क्षमता ठेवतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तानला एकाचवेळी भारत आणि अफगाणिस्तानसह अंतर्गत बंडखोरी, विशेषत: बलूचिस्तानशी लढावे लागणार आहे. 3 / 10९ ऑक्टोबरला पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका परिसरात हवाई हल्ले केले. पाकच्या हवाई हल्ल्याचे टार्गेट पाकिस्तानी तालिबानी होते. टीटीपी पाकिस्तानविरोधात लढणारा मोठा गट आहे. जो अफगाणिस्तानमध्ये लपून पाकवर हल्ले करतो असा पाकिस्तानचा आरोप आहे.4 / 10पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्याचा तालिबानने कठोर निषेध केला. सीमा ओलांडून पाकिस्तानने हल्ला केल्याचे त्यांनी म्हटलं. त्यानंतर तालिबाननेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही देशांत १ आठवडा संघर्ष सुरूच राहिला. दोन्ही बाजूने सातत्याने गोळीबारी केली जात होती. त्यात खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान सीमेवरही सैनिकांमध्ये झडप झाली.5 / 10त्यानंतर कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात दोहा, इस्तांबुल येथे चर्चा सुरू झाली. १८ ते १९ ऑक्टोबरला पहिल्यांदा सीजफायरला दोन्ही देशांनी मान्यता दिली. त्यानंतर २८ ऑक्टोबरला इस्तांबुलला दुसरी बैठक झाली. ज्यात सीजफायर कायम ठेवणे, देखरेख वाढवणे आणि उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा देणे यावर चर्चा झाली परंतु सध्या दोन्ही देशांत कुठलीही चर्चा सुरू नाही.6 / 10दुसरीकडे पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताने अफगाणिस्तान तालिबानच्या नेतृत्वात घुसखोरी केली आहे. दिल्लीच्या इशाऱ्यावर काबुलमध्ये काम होते. तालिबान भारताच्या मांडीवर बसला आहे. भारत अफगाणिस्तानचा वापर करून पाकिस्तानविरोधात प्रॉक्सी वॉर सुरू करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.7 / 10मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाला होता, त्यात भारताचा पराभव झाल्याने त्याचा बदला भारत घेत आहे असा पोकळ दावाही पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी केला. एका मुलाखतीत आसिफ यांनी भारत आम्हाला पूर्व आघाडीवर व्यस्त ठेवू इच्छित आहे तर पश्चिम आघाडीला अफगाणिस्तानचा धोका आहे. भारत पाकिस्तानातील दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असंही खोटी माहिती मुलाखतीत आसिफ यांनी दिली.8 / 10तर पाकिस्तान २ आघाड्यांवर युद्ध लढण्यास तयार आहे असा दावा आसिफ यांचा आहे परंतु प्रत्यक्षात या पोकळ धमक्या आहेत कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. सैन्याला एकाचवेळी २ आघाड्यांवर लढणे कठीण आहे असं विश्लेषकांनी सांगितले आहे. १७ ऑक्टोबरला आसिफ यांनी पाकिस्तान युद्धासाठी रणनीती तयार करत असल्याचा दावा केला होता. 9 / 10मात्र ख्वाजा आसिफ यांचा आरोप भारताने फेटाळला आहे. पाकिस्तान कायम त्यांच्या अंतर्गत अपयशाला झाकण्यासाठी शेजाऱ्यांना दोष देते. भारत अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो असं भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी म्हटलं होते.अलिकडेच तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताला भेट दिली होती. 10 / 10दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत पाकिस्तानला बलूचिस्तानमधील बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून बलूचिस्तानमध्ये विद्रोह सुरू आहे. बलूच लिबरेशन आर्मीसारखे गट पाकिस्तानी सरकारविरोधात लढत असतात. पाकिस्तानी सैन्य त्या भागात कायम तैनात असते, परंतु बंडखोर त्यांच्यावर हल्ले करत राहतात. त्यामुळे पाकिस्तानला अर्थव्यवस्था, बेरोजगारी, बलूचिस्तान बंडखोरी आणि राजकीय अस्थिरता याचे मोठे आव्हान आहे.