शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेची डबल खेळी! ट्रम्प प्रशासनाला पाकिस्तान सोपवणार 'खजिना'?; भारतासोबत चीनचीही झोप उडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:34 IST

1 / 10
ऑपरेशन सिंदूरमध्ये हस्तक्षेप करत भारतासोबतच्या युद्धानंतर पाकिस्तानातील सर्वात ताकदवान व्यक्ती सैन्य प्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीरला अमेरिकेने गिफ्ट दिले आहे. येत्या १४ जूनला अमेरिकेत साजरा केल्या जाणाऱ्या यूएस आर्मी डे सोहळ्यासाठी पाकिस्तानी सैन्य प्रमुखाला निमंत्रित करण्यात आले आहे.
2 / 10
जनरल मुनीर लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील. १२ जून रोजी मार्शल मुनीर अमेरिकेत पोहचतील असं अमेरिकेतल्या पाकिस्तानी दुतावासाने सांगितले. या काळात अमेरिकेच्या प्रमुख सैन्य नेतृत्वासोबत जनरल मुनीर यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत चीन, दहशतवाद आणि भारतासोबत तणाव यावर विषयावर दीर्घ चर्चा होऊ शकते.
3 / 10
अमेरिका पाकिस्तानवर दहशतवाद रोखण्यासाठी दबाव टाकत आहे जेणेकरून भारतासोबत त्यांचा तणाव कमी होईल परंतु भारताविरोधात अमेरिकेला त्यांच्या बाजूने वळवण्यासाठी जनरल मुनीर ट्रम्प प्रशासनाला अब्जो डॉलरचा खजिना ऑफर करण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे.
4 / 10
अफगाणिस्तानात अमेरिकेचे विशेष दूत राहिलेले खलिलजाद यांनी खुलासा केला आहे की, पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल मुनील अमेरिकन नेतृत्वासोबतच्या बैठकीत दहशतवाद आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाबाबत प्रमुख मुद्दा उपस्थित करतील. त्याशिवाय जनरल मुनीर अमेरिकेला २ मोठी ऑफर देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती निक्शन यांच्या कारकि‍र्दीत ज्याप्रकारे पाकिस्तानने चीनसोबत अमेरिकेची मैत्री केली होती त्याचप्रकारे पुन्हा एकदा पाक अमेरिकेसोबत मैत्री करण्याची तयारी करत आहे. त्याशिवाय जनरल मुनीर ट्रम्प प्रशासनासोबत मजबूत मैत्री करण्यासाठी पाकच्या जमिनीवर असलेले खनिजांचा खजिना सोपवण्याची शक्यता आहे.
5 / 10
दीर्घ काळापासून पाकिस्तान अमेरिकेकडे विनवणी करत आहे की त्यांनी पाकच्या मिनरल सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी. त्यातून पाकिस्तानला दोन फायदे होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या टॅरिफ वॉरपासून पाकची सुटका होईल दुसरे बलूच बंडखोरांना चाप बसवण्यासाठी अमेरिकेची मदत होईल.
6 / 10
पाकिस्तान अमेरिकेला कॉपर आणि सोन्याची खाणीची भागीदारी देऊ इच्छितो. ट्रम्प प्रशासनानेही खनिजांच्या पुरवठ्यासाठी चीनच्या पुढे जात पाकिस्तानात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची अपेक्षा वाढली आहे. त्यातच ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थतीच्या ऑफरमुळेही पाकिस्तान खुश आहे. परंतु ट्रम्प यांची ऑफर भारताने फेटाळली आहे.
7 / 10
अमेरिकेच्या मदतीने भारतावर चर्चेसाठी दबाव टाकण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. परंतु भारतानेही स्पष्ट शब्दात पाकिस्तानसोबत तेव्हाच चर्चा होईल जेव्हा सीमेपलीकडून दहशतवाद संपत नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अमेरिका पाकिस्तानवर दहशतवाद संपवण्यासाठी दबाव आणू शकते असंही बोलले जात आहे.
8 / 10
पाकिस्तान आणि चीन यांच्यात बीआरआय अंतर्गत बनत असलेल्या सीपीईसी प्रकल्पामुळे त्यांचे संबंध मजबूत झालेत. त्यामुळे आता पाकिस्तान तटस्थ आणि विश्वसनीय देश राहिला नाही याची भीती अमेरिकेला आहे. तर दुसरीकडे इमरान खान समर्थक जनरल मुनीर यांच्या दौऱ्याचा विरोध करत आहेत.
9 / 10
जनरल मुनीर त्यांच्या दौऱ्यात टीटीपी दहशतवादांबाबतही अमेरिकेकडून आश्वासन घेऊ शकतात जे अफगाणिस्तानातून ऑपरेट होत आहे. तसेच चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची पाकिस्तानला भीती सतावतेय आणि त्यामुळेच ते जगभरातून गुंतवणूक पाकिस्तानात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
10 / 10
पाकिस्तानकडे सोने आणि कॉपरशिवाय रेअर अर्थही आहे ज्याची चीनसोबत सुरू असलेल्या तणावात अमेरिकेला तातडीने गरज आहे. जर पाकिस्तानने रेअर अर्थ अमेरिकेला सोपवले तर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या या खेळीने चीनदेखील संतप्त होऊ शकतो.
टॅग्स :AmericaअमेरिकाPakistanपाकिस्तानchinaचीनIndiaभारत