सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 16:25 IST
1 / 3सौदी अरब आणि पाकिस्तान यांच्यातील सीक्रेट संरक्षण कराराबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. या करारानंतर पाकिस्तान त्यांचे २५ हजार सैनिक सौदी अरेबिया इथं तैनात करेल. हे सैन्य सौदी अरबवर होणाऱ्या कुठल्याही हल्ल्यात त्यांचे संरक्षण करतील. त्या बदल्यात सौदी अरब पाकिस्तानमध्ये १० अब्ज डॉलर इतकी मोठी गुंतवणूक करेल.2 / 3इतकेच नाही तर सौदी अरब भारत आणि अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचा सुरु असलेला तणाव कमी करण्यासही मदत करेल असं म्हटलं आहे. इस्रायलने कतारवर हल्ला केल्यानंतर अचानक पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यानी सौदी अरबचा दौरा केला होता. 3 / 3या दौऱ्यात शहबाज शरीफ आणि सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. संरक्षण कराराशी निगडीत असलेल्या एकाने सूत्राच्या हवाला देत म्हटलं की, या कराराचे उद्दिष्ट सौदी अरेबियाची सुरक्षा स्थिरता सुनिश्चित करणे आहे. त्या बदल्यात पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याच्या योजना आहेत.