शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 8:09 PM

1 / 9
जवळ-जवळ सर्वांनाच परिचित असलेली आणि अत्यंत स्वस्त, अशी एक वेदनाशामक (Painkiller) गोळी कोरोनाबाधीत रुग्णांवरील उपचारात अत्यंत प्रभावी ठरत आहे. आनंदाची बाब म्हणजे, या गोळीमुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची आशा वाढत आहे. इंग्लंडमधील वैज्ञानिकांनी कोरोनाबाधित रुग्णांवर या ओषधाची ट्रायलदेखील सुरू केली आहे.
2 / 9
यापूर्वी जणावरांवर केलेल्या अभ्यासात हे समोर आले होते, की या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णाची वाचण्याची शक्यता 80 टक्के वाढते. बाजारात या गोळीची किंमत साधारणपणे केवळ एक रुपया एवढीच आहे.
3 / 9
या गोळीचं नाव आहे 'Ibuprofen'. खरेतर, कोरोना व्हायरसच्या सुरुवातीच्या काळात Ibuprofenच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती. तेव्हा फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन म्हणाले होते, की हे औषध कोरोना रुग्णांचे संक्रमण वाढवू शकते.
4 / 9
द सनने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील गाइज अँड सेन्ट थॉमस हॉस्पिटल आणि किंग्स कॉलेजचे डॉक्टरांच्या टीमचे म्हणणे आहे, की पेन किलर आणि अॅन्टी इन्फ्लॅमेटरी औषध आयबुप्रोफेन कोरोना रुग्णांच्या श्वास घेण्याच्या समस्येत सुधारणा आणू शकते.
5 / 9
इंग्लंडमधील काही डॉक्टरांना आशा आहे, की या स्वस्त औषधाने कोरोना रुग्णांना आराम मिळेल. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता कमी होईल. ट्रायलदरम्यान अर्ध्या कोरोना रुग्णांना सर्वसाधारण उपचारांसह आयबुप्रोफेन औषध देण्यात येत आहे.
6 / 9
मात्र, सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या आयबुप्रोफेन ऐवजी, याच औषधाचे एक खास फॉर्म्यूलेशन ट्रायलच्या वेळी वापरले जाईल, असे डॉक्टरांनी ठरवले आहे.
7 / 9
जनावरांवर केलेल्या अभ्यासातून समोर आले होते, की आयबुप्रोफेनमुळे अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा सामना करणाऱ्या रुग्णांमध्ये सुधारणा होऊ शकते. कोरोना व्हायरसच्या सर्वात गंभीर रुग्णांमध्ये, ही समस्या प्रामुख्याने आहे.
8 / 9
लंडन येथील किंग्स कॉलेजचे प्राध्यापक मितुल मेहता यांनी सांगितले, की आम्हाला जी आशा आहे, ते खरोखरच होईल का? हे पाहण्यासाठी आम्ही ट्रायल करत आहोत.
9 / 9
काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या कमिशन ऑन ह्यूमन मेडिसिनने आपल्या अभ्यासानंतर म्हटले होते, की आयबुप्रोफेन पॅरासिटामॉल प्रमाणेच सुरक्षित आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtabletटॅबलेटmedicineऔषधंMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर