डोनाल्ड ट्रम्प यांच्या पार्टीत मस्कसोबत दिसलेली 'मिस्ट्री पार्टनर' कोण आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:54 IST2025-01-22T17:50:05+5:302025-01-22T17:54:09+5:30
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांच्यासोबत दिसलेल्या 'मिस्ट्री पार्टनर'ची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

इलॉन मस्क यांच्या तीन मुलांची आई असलेल्या शिवॉन झिलिसचे ट्रम्प यांच्या पार्टीमधील फोटो समोर आले आहेत, ज्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी न्यूरालिंकच्या उच्च कार्यकारी अधिकारी शिवॉन झिलिस आणि त्यांच्या बाराव्या मुलाच्या जन्माची घोषणा केली होती.
इलॉन मस्कसोबतच्या तिच्या नातेसंबंधामुळे आणि न्यूरालिंकमधील नोकरीमुळे शिवॉन झिलिसने खूप लक्ष वेधले होते. झिलिसचा जन्म कॅनडामध्ये शारदा नावाच्या एका भारतीय आईच्या पोटी झाला. २०१५ मध्ये दिलेल्या मुलाखतीत, तिने तिच्या पंजाबी पार्श्वभूमीबद्दल भाष्य केलं होतं.
झिलिस आईस हॉकी खेळत मोठी झाली आणि येल विद्यापीठात शिकली, जिथे ती महिला आईस हॉकी संघाची गोलरक्षक होती. तिने २००८ मध्ये अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयात पदवी घेतली.
झिलिसने आर्थिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून तीन वर्षे आयबीएममध्ये काम केले. नंतर, ती ब्लूमबर्ग बीटामध्ये सामील झाली. जिथे तिने डेटा आणि मशीन लर्निंगमध्ये गुंतवणुकीचे नेतृत्व केले.
झिलिस आणि मस्क हे आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमाद्वारे एकत्र आले. झिलिसने २०२३ पर्यंत OpenAI च्या संचालक मंडळाची सर्वात तरुण सदस्य म्हणून काम केले. मस्क यांनी २०१५ मध्ये OpenAI सह-स्थापना केली होती.
झिलिस आणि मस्कच्या नातेसंबंधाचे तपशील खाजगी आहेत मात्र कोर्टाच्या कागदपत्रांवरून असे दिसून आले की त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये जुळी मुले होती. ही बातमी जुलै २०२२ मध्येच उघडकीस आली. जून २०२४ मध्ये झिलिसने तिच्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला.