Mysterious Cave: ताऱ्यांसारख्या झगमणाऱ्या अदभूत गुहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:52 IST2018-10-08T15:43:57+5:302018-10-08T15:52:20+5:30

न्यूझीलंडमधीली वेटोर्मो ग्लोऑम गुहा ह्या जगातील आश्चर्यांपैकी एक आहेत. या गुहांचे वैशिष्ट्य म्हणजे या गुहांमधील अंतर्भात ताऱ्यांसारखा झगमगतो.

या गुहांमध्ये एराक्नोकॅम्पा ल्युमिनोसा नामक ग्लोवॉर्म कीटक आढळतात. त्यामुळे या गुहांमध्ये ताऱ्यांसारखा झगमगता प्रकाश पडतो.

वेटोमो ग्लोवॉर्म गुहा न्यूझीलंडच्या उत्तर भागामध्ये आहेत. या गुहांमध्ये भेट देण्यासाठी खास व्हिजिटिंग सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच येथे पर्यटकांसाठी विशेष टूरचे आयोजन केले जाते.

या चमचमणाऱ्या गुहेत नावेमध्ये बसून प्रवेश करणे हा एक अदभूत अनुभव असतो.

भूगर्भीय आणि ज्वालामुखीय हालचालींमुळे गेल्या तीन कोटी वर्षांच्या काळात वेटोमो क्षेत्रात चुनखडीपासून अशा प्रकारच्या 300 गुहा बनल्या आहेत.