या देशांमध्ये मिळतात सर्वाधिक सरकारी सुट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 15:56 IST2019-09-20T15:47:54+5:302019-09-20T15:56:02+5:30

सरकारी सुट्ट्या ह्या सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात. पण जगभरात कुठल्या देशात किती सरकारी सुट्ट्या मिळतात हे तुम्हाला माहिती आहे का. आज जाणून घेऊया सर्वांधिक सरकारी सुट्ट्या असणाऱ्या देशांविषयी
जापान
जापानमध्ये एकूण 15 सरकारी सुट्ट्या असतात.
अर्जेंटिना
अर्जेंटिनामध्येसुद्धा 15 सरकारी सुट्ट्या मिळतात, त्यात 1 मे, स्वातंत्र्य दिन आणि राष्ट्रीय ध्वज दिन यांचा समावेश आहे.
पाकिस्तान
पाकिस्तानमध्ये 16 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात. यामध्ये बहुतांश सुट्ट्या ह्या धार्मिक दिवशी दिल्या जातात.
तुर्की
तुर्कीमध्येसुद्धा 16 सार्वजनिक सुट्ट्या दिल्या जातात.
थायलंड
थायलंडमध्ये एकूण 16 सरकारी सुट्ट्या दिल्या जातात. यामध्ये नववर्ष, लेबर डे यांचा समावेश आहे.
भारत
जगामध्ये सर्वाधिक सरकारी सुट्ट्या ह्या भारतात दिल्या जातात. भारतात एकूण 21 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्यांचे प्रमाण कमी जास्त होत असते.