मेगन मार्केल सिक्रेट ट्रिपवर आली होती भारत दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 22:58 IST2019-04-20T22:50:27+5:302019-04-20T22:58:49+5:30

डचेस ऑफ ससेक्स मेगन मार्केल ही दोन वर्षांपूर्वी एका सिक्रेट ट्रीपवर भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी तिने चक्क साडी नेसून भारतभ्रमण केले होते.
दर्जेदार अभिनय आणि प्रिन्स हॅरीसोबत असलेल्या संबंधांमुळे चर्चेत असलेली मेगन मार्केल ही वर्ल्ड व्हिजन कॅनडा या संस्थेसाठीच्या चॅरिटीसाठी मेगन मार्केल भारत दौऱ्यावर आली होती.
यावेळी मेगन मार्केल हिने आपला बहुतांश वेळ लैंगिक समानतेविषयी जनजागृती करण्यामध्ये व्यतित केला होता.
भारत दौऱ्यादरम्यान मेगन मार्केल हिने विविध संस्थांना भेट दिली होती.
विशेष बाब म्हणजे मेगन मार्केल भारतातील बहुतांश ठिकाणी पारंपरिक साडी परिधान करून फिरली. तसेच तिने आपल्या हातावर मेहंदीही काढून घेतली होती.