लय भारी! विमानदेखील ओढू शकते ही व्यक्ती; ठरली सर्वात शक्तिशाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 23:01 IST2019-12-14T22:58:03+5:302019-12-14T23:01:31+5:30

मार्टिन लिसिस यांची जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून निवड झाली आहे.
अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामध्ये राहणारे लिसिस ३५० किलोंपर्यंतचं वजन लिलया उचलू शकतात.
लिसिस बोईंग विमान अगदी सहज ओढू शकतात.
गेल्या कित्येक वर्षांपासून लिसिस स्ट्राँगमॅन स्पर्धेची तयारी करत होते. मात्र त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं.
अखेर यंदा लिसिस यांचं स्ट्राँगमॅन स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. ही स्पर्धा अमेरिकेत अतिशय लोकप्रिय आहे.