शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इजिप्तच्या समुद्रात सापडला कुबेराचा खजिना, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 12:56 PM

1 / 6
इजिप्तच्या समुद्र किनाऱ्याजवळ शास्त्रज्ञांना असा खजिना सापडला आहे, जो अतिशय मौल्यवान आहे. यूरोपियन इंस्टिट्युट फॉर अंडर वॉटर आर्कियोलॉजीने इजिप्तच्या भूमध्यसागरी तटाजवळ असलेल्या एका सागरी पॉईंटमध्ये खजिन्यासोबत काही रहस्यमय गोष्टी सापडल्याची माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते ज्या खोलीवरून ते परतले आहेत. ते एक बुडालेलं मंदिर आहे. फ्रान्समधील तज्ज्ञ फ्रँग गोडियो यांच्या नेतृत्वाखाली अबुकीरच्या आखातामध्ये असलेल्या पोर्ट सिटीमधील हा शोध खूप महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
2 / 6
रिसर्च टीमने दक्षिणेकडील कालव्यामध्ये तपास केला. तिथे प्राचीन मंदिराच्या दगडाचे अवशेष सापडले आहेत. ते इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील मध्यावर आलेल्या एका विध्वंसक घटनेमध्ये उद्ध्वस्त झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार हे ठिकाण भगवान अमूनचं मंदिर होतं. येथील लोक आपल्या शक्तीच्या उपासनेसाठी येत असत.
3 / 6
रिसर्च टिमने सांगितले की, आम्ही मंदिराच्या खजिन्याशी संबंधित बहुमूल्य वस्तूंचा शोध घेतला आहे. येथे आम्हाल पूजा-पाठ करण्यासाठी वापरण्यात येणारी चांदीची भांडी, सोन्याचे मौल्यवान दागिने, अत्तर किंवा इतर सुगंधाचा अलबास्टर कंटेनर सापडला आहे. आम्हाला या मौल्यवान संपत्तीचा शोध लागला, याचा आम्हाला आनंद आहे. त्याबरोबरच आम्ही हजारो वर्षांपूर्वी या शहरात राहणाऱ्या लोकांच्या धर्मपरायणतेचे साक्षीदार बनले आहेत.
4 / 6
संस्थेने सांगितले की, गॉडडियो यांची टीम आणि इजिप्तच्या पर्यजन आणि पुरावशेष मंत्रालयाने अंडर वॉटर पुरातत्त्व विभागाकडून संयुक्तपणे केलेल्या पुरातत्त्वीय खोदकामामध्ये भूमिगत संरचनांची माहिती मिळाली आहे. ती इसवी सन पूर्व पाचव्याशतकापासून बऱ्यापैकी संरक्षित असलेल्या लाकडाच्या खांबावर आणि बीमवर उभी होती. IEASM चे अध्यक्ष आणि उत्खननाचे संचालक गोड्डीयो यांनी सांगितलं की, हिंसा आणि प्रलयाच्या भयावकतेमधूनही टिकून राहिलेल्या अशा नाजूक वस्तूंचा शोध खूप मार्मिक आहे.
5 / 6
या खजिन्याच्या एकूण किमतीचा अंदाज सध्यातरी लावता आलेला नाही.
6 / 6
समुद्रात शोधण्यात आलेल्या मंदिराच्या पूर्व भागात पुरातत्ववेत्यांनी सौंदर्य, तारुण्य आणि प्रेमाला समर्पित असलेली ग्रीक देवता एफ्रोडाइट हिचंही एक मंदिर शोधलं आहे. संस्थानने सांगितलं की, सॅटे वंश (६६४ ते ५२५)चे राजे फिरोन याच्या काळात ज्या ग्रीक व्यक्तींना व्यापार करण्याची आणि शहर वसवण्याची परवानगी होती. त्यांच्याकडे त्यांच्या देवदेवतांची मंदिरंही होती.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयhistoryइतिहास