जपान भूकंप PHOTOs! बुलेट ट्रेनमध्ये 1400, पार्किंगमध्ये ५०० लोक अडकले; आणखी एक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 01:13 PM2024-01-02T13:13:19+5:302024-01-02T13:18:07+5:30

Japan earthquake updates: इशिकावामध्ये २०० इमारती जळून खाक झाल्या आहेत. तर ३२५०० घरांमध्ये वीज नाहीय.

जपान भूकंप PHOTOs! बुलेट ट्रेनमध्ये 1400, पार्किंगमध्ये ५०० लोक अडकले; आणखी एक इशारा

इशिकावामध्ये २०० इमारती जळून खाक झाल्या आहेत. तर ३२५०० घरांमध्ये वीज नाहीय. अशातच आणखी एका मोठ्या भूकंपाचा इशारा देण्यात आल्याने जपानमध्ये खळबळ उडाली आहे.

भूकंपामुळे जपानमधील नोटो क्षेत्राची जमीन भूकंपाच्या केंद्रापासून 1.3 मीटरने पश्चिमेकडे सरकली आहे. जपानच्या जीएसआयने ही माहिती दिली आहे.

जपान सरकारने एक लाख लोकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. या लोकांना सुरक्षित स्थळी पाठविण्यात आले आहे. त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आला असून हे लोक आता पुन्हा घरी परतू लागले आहेत.

आणखी एक काळजी करणारी बातमी म्हणजे नोटोमधील पार्किंगमध्ये ५०० लोक वाहनांमध्येच अडकले आहेत. रस्ते उखडल्याने हे लोक बाहेर पडू शकत नाहीएत.

गेल्या ११ तासांपासून १४०० लोक बुलेट ट्रेनमध्ये अडकून पडले आहेत, असे पश्चिम जपान रेल्वे कॉर्पोरेशनने म्हटले आहे. रुळांची तपासणी करण्यासाठी होकुरिकू शहर आणि तोयामा दरम्यान बुलेट ट्रेन थांबविण्यात आल्या आहेत.

काही ट्रेन पुन्हा सुरु करून मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. जपान टाईम्सनुसार बहुतेकांना ३ वाजल्यानंतरच प्रवास सुरु करता येणार आहे.

जपानमधील भूकंपानंतर अनेक रेल्वे आणि उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नोटोमध्ये विमानतळाची धावपट्टी, टर्मिनल आणि प्रवेश रस्ता मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला आहे.