Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 11:56 IST
1 / 12Israel–Iran War : मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे जग दोन गटात विभागले आहे. जगाचे अस्तित्व वाटवण्यासाठी आम्ही कारवाई केल्याचे इस्त्रायलचे मत आहे. इराण अण्वस्त्रे बनवण्याच्या जवळ आहे आणि ते थांबवावे लागेल. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि इटलीसारखे देश इस्रायलच्या कारवाईला उघडपणे पाठिंबा देत आहेत, तर चीन, येमेन आणि इराक त्याच्या विरोधात आहेत.2 / 12तर भारताने शनिवारी सांगितले की, ते इस्रायल-इराण संघर्षावरील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) विधानावरील चर्चेत भाग घेत नाहीत. या दरम्यान, भारताने तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतिचा आग्रह धरला. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की , परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी त्यांच्या इराणी समकक्षाशी या विषयावर चर्चा केली आणि या घडामोडींबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाची तीव्र चिंता व्यक्त केली.3 / 12परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, एससीओने १३ जून रोजी इस्रायल आणि इराणमधील अलीकडील घडामोडींवर एक निवेदन जारी केले. यामध्ये संघटनेने इराणवरील हल्ल्याबद्दल इस्रायलचा निषेध केला. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गांचा वापर करावा असा आमचा आग्रह आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताची भूमिका इतर एससीओ सदस्यांना कळवण्यात आली आहे. प्रत्यक्षात, इराण एससीओचा सदस्य आहे. निवेदनात म्हटले आहे की, एससीओ सदस्य देश इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित परिस्थिती शांततापूर्ण, राजकीय आणि राजनैतिक मार्गांनी सोडवण्याचा सल्ला देतात. 4 / 12इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो तजानी यांनी संवादाचे आवाहन केले आहे. तजानी यांनी इराणला इस्रायलसोबतच्या संघर्षात लष्करी वाद टाळण्याचे आवाहन केले आहे, जे संपूर्ण प्रदेशासाठी अत्यंत धोकादायक असेल.5 / 12पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी ट्विटरवर लिहिले की, इराणवरील अन्याय इस्रायली हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. पाकिस्तान इराण सरकार आणि लोकांच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे.6 / 12तुर्कीने इस्रायली हल्ल्याचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असल्याचे म्हटले. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या हवाई हल्ल्यावरून असे दिसून येते की इस्रायलला राजनैतिक मार्गाने समस्या सोडवायच्या नाहीत.7 / 12फ्रान्सने सर्व पक्षांना परिस्थिती आणखी चिघळू नये असे आवाहन केले. परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, पॅरिस इराणच्या आण्विक महत्त्वाकांक्षेबद्दल चिंतित आहे आणि इस्रायलच्या पाठीशी आहे.8 / 12कतारने आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायली उल्लंघन त्वरित थांबवण्याचे आवाहन केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कतार इस्रायली हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि तो इराणच्या सार्वभौमत्वाचे आणि सुरक्षेचे घोर उल्लंघन मानतो.9 / 12ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले की, इस्रायलचे इराणवरील हल्ले चिंताजनक आहेत आणि सर्व पक्षांनी माघार घेऊन तणाव कमी करण्याची गरज आहे. इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे.10 / 12चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान म्हणाले की, या कारवाईच्या गंभीर परिणामांबद्दल चीनला खूप चिंता आहे. बीजिंग इराणच्या सार्वभौमत्वाचे, सुरक्षिततेचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणाऱ्या कृतींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्यांना विरोध करतो.11 / 12संपूर्ण प्रदेश अस्थिर करू शकणारी पावले दोन्ही बाजूंनी टाळावीत असे जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ म्हणाले. इस्रायलला त्यांचे अस्तित्व आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. जर्मनी चिंता व्यक्त करत आहे.12 / 12अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटली इस्रायलला उघडपणे पाठिंबा देत आहेत, तर चीन, येमेन, इराक, तुर्की आणि ओमान इराणवरील हल्ल्याला विरोध करत आहेत.