By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:05 IST
1 / 10इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त सैन्य अभियान ऑपरेशन एपिक फ्यूरी सुरू करून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना संपवण्यात यशस्वी झाले. परंतु राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणमधील सत्ता परिवर्तनाचे स्वप्न आजही अपूर्ण आहे.2 / 10वॉशिंग्टन पोस्टचा ताजा रिपोर्ट आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने या सैन्य कारवाईच्या यशावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. भलेही अमेरिकेने मोठ्या प्रमाणात हवाई आणि नौदलाने हल्ले केले असतील तरी इराणमधील सैन्य आणि धार्मिक पाया इतका खोलवर रुजला आहे की केवळ हल्ल्याने ते उद्ध्वस्त करणे अशक्य आहे.3 / 10नॅशनल इंटेलिजेंस कौन्सिलने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, इराणची व्यवस्था सत्ता हस्तांतरण प्रक्रियेच्या आधी निश्चित केली आहे. जी सर्वोच्च नेत्याच्या गैरहजेरीतही काम करत राहते. इराणी संस्था आणि त्यांची प्रक्रिया अनेक दशकांपासून स्थापन केलीय. हे तंत्र अमेरिकेच्या दबावानंतरही अंतर्गत पकड मजबूत ठेवण्यास सक्षम आहे असं ब्रूकिंग्स इन्स्टिट्यूशनचे तज्ज्ञ सुजैन मलोनी यांनी सांगितले.4 / 10सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर इराणमध्ये उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स पुढील नेत्याची निवड करेल. ज्यात इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सची भूमिका निर्णयाक राहील. दिवंगत नेत्याचा मुलगा मुजतबा खामेनेई सत्ता सांभाळतील अशी चर्चा आहे. परंतु अली लारीजानीसारख्या वरिष्ठ नेत्याचा त्याला विरोध आहे.5 / 10दुसरीकडे राष्ट्रपती ट्रम्प यांनी सोशल मीडियावर इराणला विना अट आत्मसमर्पण करण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय मुजतबा खामेनेई यांना असक्षम सांगत इराणचा पुढचा नेता कोण असेल हे ठरवण्यात माझीही भूमिका असायला हवी असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.6 / 10डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकिर कलीबाफ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे भवितव्य हे फक्त इराणी जनता ठरवेल आणि त्यासाठी कुठलीही बाहेरील गँग नको असं त्यांनी स्पष्ट सांगितले.7 / 10युद्ध सुरू होऊन आता दुसरा आठवडा सुरू होत आहे आणि त्याची व्याप्ती हिंद महासागरापासून नाटो सदस्य तुर्कीच्या सीमेपर्यंत पसरली आहे. इराणी राजवट चिरडली जात आहे आणि त्यांचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अणुकार्यक्रम नष्ट करणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय आहे असं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अण्णा केली यांनी दावा केला आहे. 8 / 10मात्र जमिनीवरील वास्तव वेगळेच सांगते. आतापर्यंत इराणमध्ये मोठ्या उठावाचे किंवा सुरक्षा दलांमध्ये फूट पडण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. इराणचा विखुरलेला विरोधक सध्या सत्ता हस्तगत करण्याच्या स्थितीत नाही असं गुप्तचर अहवालात म्हटलं आहे. इराणी नेतृत्वाने ट्रम्पसमोर झुकणे त्यांच्या विचारसरणीच्या पूर्णपणे विरुद्ध आहे असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 9 / 10अमेरिकेच्या गुप्तचर समुहाच्या १८ एजन्सींचा एकत्रित निष्कर्ष असा आहे की केवळ बॉम्बहल्ला केल्याने राजवट बदलणार नाही. जोपर्यंत इराणी राजवट पूर्णपणे कोसळत नाही तोपर्यंत राष्ट्रपती ट्रम्प यांच्याकडे इराणच्या राजकीय भविष्यावर प्रभाव पाडण्याचे मर्यादित पर्याय असतील. 10 / 10सध्या तरी संपूर्ण जगाचे लक्ष इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स सभेवर केंद्रित आहे. ते या संकटाच्या काळात देशाचे नेतृत्व करण्यासाठी कोणाची निवड करतात हे आगामी काळात दिसून येईल.