By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:37 IST
1 / 10मध्य पूर्वेतील वाढत्या तणावात इराणने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना करारा जवाब दिला आहे. जर तेल वाहतूक रोखली तर इराणवर भीषण हल्ला करू असं ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यावर इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने पलटवार केला आहे.2 / 10स्ट्रेट होर्मुझ येथून तेलाची वाहतूक तर सोडाच, पण १ लीटर तेलही बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकीच इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना दिली आहे. स्ट्रेट होर्मुझमधील वाहतूक बंद ठेवण्याचा हा इशारा संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यामुळे पुढील काळात इंधनाच्या किंमतीवर मोठा परिणाम होणार आहे.3 / 10जर इराणने स्ट्रेट होर्मुझमधील तेल जहाजांची वाहतूक रोखली तर अमेरिका विध्वंस माजवेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बजावले होते. परंतु त्यानंतर काही तासांत इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने ५ शब्दांत त्यांना उत्तर दिले, ते म्हणजे १ लीटर तेलही जाऊ देणार नाही4 / 10इराण आणि अमेरिका यांच्यातील या युद्धात इराणने घेतलेल्या पवित्र्यामुळे जगात ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती आहे. स्ट्रेट होर्मुझमधील तेल वाहतूक रोखली तर इंधनाची कमतरता अनेक देशांना भासेल. त्यातून जगावर ऊर्जा संकट वाढण्याचे संकेत आहेत असं तज्त्रांनी सांगितले.5 / 10इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने सांगितले की, जर इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून हल्ले सुरूच राहिले तर स्ट्रेट होर्मुझमधून १ लीटर तेलही बाहेर जाऊ देणार नाही. इतकेच नाही तर गरज भासल्यास संपूर्ण परिसरातून तेल पुरवठा बंद केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.6 / 10इराणच्या या धमकीचा अर्थ सौदी अरेबिया, यूएई, कुवेत, बहरीन, कतार आणि इराकसारख्या देशांमधूनही जगाला तेल मिळणार नाही. त्यातून जगभरात तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होईल आणि त्याचा फटका चीन, भारतासारख्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला बसेल. 7 / 10अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे पुढील काळात हे संकट आणखी वाढणार आहे. ट्रम्प सातत्याने इराणवरील हल्ले वाढवण्याची योजना आखत आहेत. जर अमेरिका आणि इस्रायल यांच्या हल्ल्याला पलटवार म्हणून इराणने कच्च्या तेलाची वाहतूक रोखली तर जगाला ऊर्जा संकटाला सामोरे जावे लागणार आहे.8 / 10डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला होता. स्ट्रेट होर्मुझमधून होणारा तेल पुरवठा कुणी रोखण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्याविरोधात २० पट अधिक कठोर कारवाई केली जाईल. इराणने तेल रोखण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका असा हल्ला करेल ज्यातून इराणला पुन्हा एक देश म्हणून उभे राहणेही कठीण होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं.9 / 10आखाती देशांमधील युद्धामुळे अमेरिकेसह जगातील अनेक देशात इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. इराणने अमेरिका, इस्रायल हल्ल्याला प्रत्युत्तर देत स्ट्रेट होर्मुझमधील तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना रोखले आहे. 10 / 10स्ट्रेट होर्मुझ हा युरोप आणि आशिया खंडातील एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. या मार्गात जर अडथळे आले तर कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढतील आणि जगातील अनेक देशात इंधनाचा तुटवडा होईल. ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल.