शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

जेफरी एपस्टीनच्या 'रेड रूम'चं हादरवणारं वास्तव; तरुणींचं शोषण अन् बड्या हस्तींचे व्हायचे काळे धंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:06 IST

1 / 7
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, पॅरिसमधील आर्क डी ट्रायम्फजवळ असलेल्या एपस्टीनच्या आलिशान फ्लॅटमध्ये एक 'रेड रूम'बनवण्यात आली होती. या खोलीत जगभरातील श्रीमंत पाहुण्यांसाठी अश्लील कृत्ये आणि मानवी तस्करीतून आणलेल्या तरुणींचे शोषण केले जात असे.
2 / 7
अमेरिकन न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये या 'रेड रूम'चे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या खोलीत अनेक महिला विवस्त्र होऊन डान्स करताना दिसत आहेत.
3 / 7
या व्हिडिओमध्ये महिलांचे चेहरे पुसट करण्यात आले असले तरी, तिथे घडणारे प्रकार अत्यंत घृणास्पद होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, याच फ्लॅटमध्ये अनेक प्रतिष्ठित महिलांनाही कपड्यांशिवाय डान्स करण्यास भाग पाडले जात असे.
4 / 7
या 'रेड रूम'शी संबंधित फोटोंमध्ये ब्रिटनचे माजी राजकारणी पीटर मंडेलसन हे देखील केवळ अंतर्वस्त्रात दिसले आहेत. या फोटोंमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
5 / 7
महत्त्वाचे म्हणजे, २००३ आणि २००४ च्या बँक स्टेटमेंटवरून असे समोर आले आहे की, मंडेलसन यांना एपस्टीनकडून ७५ हजार डॉलर्स मिळाले होते. मात्र, या फ्लॅटमध्ये आपले अंतर्वस्त्रातील फोटो का काढले गेले, हे आठवत नसल्याचा अजब दावा मंडेलसन यांनी केला आहे.
6 / 7
असे मानले जाते की, या पॅरिसमधील प्रॉपर्टीमध्ये एपस्टीन बड्या हस्तींच्या मनोरंजनासाठी खास इव्हेंट्स आयोजित करायचा. यामध्ये लैंगिक शोषणाचे गुन्हे सर्रास घडत असत. या प्रॉपर्टीमध्ये एक मसाज रूम देखील होती, जी मानवी कवटी आणि भुवयांच्या विचित्र कलाकृतींनी सजवलेली होती.
7 / 7
२०२४ मध्ये एपस्टीनच्या या कुप्रसिद्ध फ्लॅटची विक्री करण्यात आली. मूळ किमतीपेक्षा २० लाख पाउंड सवलत देऊन हा फ्लॅट बल्गेरियाचे प्लास्टिक पॅकेजिंग टायकून जॉर्जी टुचेव यांनी ८२ लाख पाउंडला खरेदी केला आहे. मालक बदलला असला तरी, या भिंतींआड दबलेली शोषणाची गुपिते आजही जगाला चकित करत आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmericaअमेरिका