CoronaVirus : बापरे!...तर भारतात दररोज सापडतील 3 लाख नवे रुग्ण; MITचा अभ्यासातून गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 15:31 IST2020-07-09T15:08:35+5:302020-07-09T15:31:51+5:30
कोरोनावर लस सापडली नाही, तर भारतातील परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते.

अमेरिके(US)मधील प्रतिष्ठित मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)च्या संशोधकांनी अभ्यासाअंती महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे.
कोरोनावर लस सापडली नाही, तर भारतातील परिस्थिती अत्यंत बिकट होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते, पुढील वर्षापर्यंत ही लस उपलब्ध न झाल्यास 2021च्या हिवाळ्याअखेरीस भारतात दररोज 2.87 लाख नवीन संक्रमित रुग्ण सापडण्याची शक्यता आहे.
कोरोनासाठी शास्त्रज्ञांनी एक मॉडेल तयार केलं आहे. त्या मॉडेलनुसार कोरोना संक्रमितांच्या बाबतीत भारत अमेरिकेलाही मागे टाकेल, असा दावा करण्यात आला आहे.
हा फक्त अंदाज आहे, पण लस सापडली नाही तर तो अचूक ठरण्याची भीती एमआयटीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
एमआयटीचे प्राध्यापक हाजीर रहमानदाद आणि जॉन स्टेरमन, पीएचडी विद्यार्थ्यांमधील यांग लिम यांनी १० देशांच्या संक्रमण दराचा अंदाज घेऊन हा अभ्यास केला आहे.
लस न सापडल्यास भारतात 2021च्या हिवाळ्याअखेरीस दरदिवशी 2.87 लाख नवीन प्रकरणे समोर येतील, असं अभ्यासाअंती सांगितलं आहे.
भारतानंतर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इराण, इंडोनेशिया, ब्रिटन, नायजेरिया, तुर्की, फ्रान्स आणि जर्मनीत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल.
हा फक्त अंदाज आहे, पण लस सापडली नाही तर तो अचूक ठरण्याची भीती एमआयटीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
केवळ संभाव्य धोक्याची भविष्यवाणी केली जाते आणि भविष्यातील घटनांचा अंदाज येत नाही, असंही संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.
कठोर तपासणी मोहीम आणि संक्रमित लोकांशी असलेली संपर्काची साखळी तोडल्यास भविष्यातील घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका कमी होईल.
बेपर्वा वृत्ती आणि संक्रमणाची भीती न बाळगता स्वैराचार केल्यास साथीचा रोग पसरण्याची शक्यता आहे. संशोधकांनी सांगितले की, 2021ची भविष्यवाणी ही लस न सापडण्याच्या स्थितीवर अवलंबून आहे.
एमआयटीनेही भारतातील कमी चाचणी दराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारतात सध्या 10 लाख लोकांपैकी केवळ 7,782 जणांची चाचणी घेण्यात येत आहेत, तर अमेरिकेत हा दर 1,19,257 आणि ब्राझीलमध्ये 21000 पेक्षा जास्त आहे.
या मॉडेलअंतर्गत 84 देशांच्या आकडेवारीवर आधारित अनेक महत्त्वाचे खुलासे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, साथीची वास्तविक स्थिती कमी केली जात आहे.
संशोधकांच्या मते १८ जूनपासूनची प्रकरणे आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेतल्यास क्रमश: 11.8 आणि 1.48पट अधिक आहे.
कोरोना विषाणूचा अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक फटका भारताला बसला आहे.
परंतु जर 10 लाख लोकसंख्येच्या आधारावर आपण संक्रमित प्रकरणे आणि दर मृत्यूसंदर्भात चर्चा केल्यास भारतात इतर देशांपेक्षा चांगली परिस्थिती आहे.