हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्ससमध्ये थडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 16:48 IST2017-08-26T14:47:28+5:302017-08-26T16:48:20+5:30

हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्सस राज्यात येऊन थडकले आहे.

या चक्रीवादळामुळे टेक्ससमधील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

गेल्या 12 वर्षातील टेक्ससमधील हे सर्वात मोठे चक्रीवादळ आहे. वादळापासून बचाव करण्यासाठी लोकांनी हॉटेलात आश्रय घेतला आहे.

चक्रीवादळामुळे टेक्ससमध्ये 40 इंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याकडे पाहताना स्थानिक मोनिका चावेझ

या चक्रीवादळाला कॅटेगरी 3 मध्ये वर्ग करण्यात आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी डिझास्टर प्रोक्लमेशनवर स्वाक्षरी केली असून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या परिसरामध्ये मदत करण्यात येत आहे.

हॉटेलात आश्रय घेतलेले लोक अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या नातलगांना खुशाली कळवत आहेत.

वेगवान वाऱ्यामुळे टेक्ससच्या समुद्रात उंच लाटा तयार होत आहेत.

चक्रीवादळामुळे किनारी परिसरामध्ये वेगाने वारे वाहात आहेत.