By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:12 IST
1 / 8हाँगकाँगच्या ताई पो जिल्ह्यातील एका मोठ्या निवासी संकुलात भीषण आग लागली. या घटनेने शहर हादरले आणि संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली.2 / 8वांग फुक कोर्ट नावाच्या या २००० फ्लॅट्सच्या निवासी संकुलात अचानक लागलेल्या आगीने जवळच्या अनेक उंच इमारतींना वेढले.3 / 8या घटनेत किमान ४४ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी बरेच जण बेपत्ता असल्याची भीती आहे.4 / 8मृतांचा आकडा वाढतच आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जखमी आणि बाधितांसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.5 / 8आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दूरवरून धुराचे लोट आणि ज्वाळा दिसत आहेत.6 / 8आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या ७०० जवानांना तैनात करण्यात आले. अनेक ठिकाणी, हायड्रॉलिक शिडी वापरून उंच मजल्यांवरून पाण्याच्या तोफांचा फवारणी केली जात आहे.7 / 8टॉवर्समध्ये अनेक लोक अडकल्याचे वृत्त आहे. हाँगकाँग अग्निशमन सेवा विभागाला दुपारी २:५१ वाजता आगीची सूचना देण्यात आली. विभागाने जवळच्या रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.8 / 8९० टक्के लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. ही आग लेव्हल ५ची होती. त्यामुळे बरीच जीवित आणि वित्तहानी झाली आहे.