या आहेत जागतील चित्रविचित्र प्रमाणवेळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:33 PM2019-09-23T15:33:32+5:302019-09-24T16:07:09+5:30

वेळ कुणासाठीही थांबत नाही. तो आपल्या गतीने पुढे जातच असतो. मात्र जगातील विविध भागात वेगवेगळ्या प्रमाणवेळा दिसून येतात. आज जाणून घेऊया अशाच काही चित्रविचित्र प्रमाणवेळांविषयी.

कम्युनिस्ट चीनमध्ये संपूर्ण देशभर एकच प्रमाणवेळ लागू आहे. त्यामुळे अवाढव्य विस्तार असूनही चीनमध्ये एकच प्रमाणवेळ लागू आहे. ग्रिनिचच्या वेळेपेक्षा ही प्रमाणवेळ आठ तासांनी पुढे आहे.

स्पेनचा हुकूमशहा फ्रँकोने हिटरलशी जवळीक दाखवण्यासाठी 1940 मध्ये ग्निनिच प्रमाणवेळऐवजी सेंट्रल युरोपीयन प्रमाणवेळेला जवळ केले होते. त्यामुळे स्पेनमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त उशिरा होतो.

सणकी हुकूमशहा किम जोंग उनच्या वर्चस्वाखाली असलेल्या उत्तर कोरियाने 2015 मध्ये आपल्या घड्याळातील वेळ अर्धा तास मागे केली होती.

मात्र हल्लीच दक्षिण कोरियात गेल्यावर दोन्हीकडच्या वेळांमध्ये फरक पाहून व्यतिथ झालेल्या किम जोंग उन यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियाची प्रमाणवेळ अर्धा तास पुढे सरकवण्याचा निर्णय घेतला.

भारतापासून वेगळेपणा दिसावा म्हणून नेपाळने आपली प्रमाणवेळ ही भारतापेक्षा 15 मिनिटे पुढे ठेवली आहे.

व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांनी 2016 मध्ये आपल्या देशाची प्रमाणवेळ 30 मिनिटे पुढे सरकवण्याची घोषणा केली होती.

देशाच्या प्रमाणवेळेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल समोआ देशाने केला आहे. 2011मध्ये समोआने आपल्या देशाची प्रमाणवेळ 24 तासांनी पुढे सरकवली. त्यामुळे त्या देशात 2011 मध्ये 29 डिसेंबरनंतर थेट 31 डिसेंबर उजाडला होता.

जर्मनीमध्ये वर्षातून दोन वेळा प्रमाणवेळ बदलली जाते. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर करण्यासाठी प्रमाणवेळ एका तासाने पुढे सरकवली जाते. तर थंडीमध्ये ही प्रमाणवेळ एक तास मागे घेतली जाते.

भारतात मात्र संपूर्ण देशात एकच प्रमाणवेळ लागू आहे. मात्र या प्रमाणवेळेमुळे पूर्वेत्तर भारतातील काही राज्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.