कडाक्याच्या थंडीनं रशिया गोठलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 21:20 IST2018-01-17T21:10:21+5:302018-01-17T21:20:39+5:30

रशियाच्या ओयम्याकोन खेड्यात तापमान उणे 62 अंश सेल्सियसवर आले आहे. त्यामुळे लोकांच्या डोळ्यांच्या पापण्याच गोठून गेल्या.

तापमानाची अधिकृत नोंद करणा-या स्थानिक केंद्रातील मापकावरील आकडे उणे 59 अंश सेल्सियस दाखवत होते.

स्थानिक रहिवाशांनी मात्र हे तापमान उणे 67 अंश सेल्सियस एवढे असल्याचे सांगितले.

जगात तापमान उणे 68 अंश सेल्सिअस झाल्यास तेथे मनुष्य प्राणी वास्तव्य करू शकत नाही.

ओयम्यॉकोनला भेट द्यायला उत्साही चिनी पर्यटक आलेच. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही त्यांनी पर्यटनाचा आनंद लुटला.

तापमान उणे 62 अंश सेल्सियसवर आल्यामुळे अनेक गाड्या बर्फाच्या चादरीनं आच्छादल्या आहेत.

टॅग्स :रशियाrussia