शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुबईच्या वाळवंटात फुललं ‘मिरॅकल गार्डन’, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:21 PM

1 / 7
दुबईच्या वाळवंटात एक असं गार्डन आहे ते पाहताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल. वाळवंटात सुंदर फुलांनी फुललेलं, हिरवाईने नटलेलं गार्डन म्हणजे ‘मिरॅकल गार्डन’
2 / 7
मिरॅकल गार्डनमधील फुलांपासून बनविण्यात आलेल्या निरनिराळ्या रचना, सुंदर कलाकुसर आणि जोडीला नैसर्गिक रंगांची मुक्त उधळण असलेल्या या गार्डनचं सौंदर्य पर्यटकांना भूरळ पाडतं.
3 / 7
दुबईस्थित ‘आकार लँड स्केपिंग सर्विसेस अँड अॅग्रीकल्चर’ या कंपनीने ‘मिरॅकल गार्डन’ची ही अद्भुत संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
4 / 7
साधारणपणे ऑक्टोबरच्या सुमारास ‘मिरॅकल गार्डन’ हे पर्यटकांसाठी उघडण्यात येतं. त्यानंतर हे गार्डन मे महिन्यापर्यंत चालू राहतं.
5 / 7
७२ हजार चौ. मीटर आकाराच्या गोलाकार जागेत ही बाग फुलवलेली असून जगातील हे सर्वात मोठं फुलाचं गार्डन आहे.
6 / 7
रस्त्याच्या दुतर्फा असलेली मनमोहक फुलं, सात कमानी, सात चांदण्या, पिसारा फुलवलेले मोर, लहान मोठी फुलांची घरे, पिरॅमिडच्या आकारात फुललेली विविध प्रजातीची फुले अत्यंत मोहक आहेत.
7 / 7
सर्वात जास्त लांबीची फुलांची भिंत हे मिरॅकल गार्डनचे वैशिष्ट्य असून या गार्डनची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
टॅग्स :Dubaiदुबई