By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:25 IST
1 / 8आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सध्या जगभरात काय चमत्कार घडवू शकते, याचे एकामागून एक थक्क करणारे कारनामे समोर येत आहेत. तंत्रज्ञानाच्या या युगात आता घर खरेदी-विक्रीसाठी महागड्या एजंट्सची गरज उरली आहे की काय, असा प्रश्न पडण्यासारखी घटना अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात घडली आहे.2 / 8मियामी येथील रॉबर्ट लेविन या व्यक्तीने कोणत्याही मध्यस्थाशिवाय केवळ 'एआय'च्या मदतीने आपले घर तब्बल १ मिलियन डॉलर्सला (सुमारे ९.५ कोटी रुपये) विकून सर्वांना चकित केले आहे.3 / 8रॉबर्ट लेविन यांना आपले घर विकायचे होते. त्यांनी सुरुवातीला स्थानिक रिअल इस्टेट एजंट्सकडे चौकशी केली. एजंट्सनी घराची जी किंमत सांगितली होती, त्यापेक्षा 'एआय'च्या सल्ल्यामुळे लेविन यांना तब्बल १ कोटी रुपये जास्त मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, ज्या व्यवहारासाठी महिने लागतात, तो व्यवहार केवळ ३ दिवसांत पूर्ण झाला.4 / 8लेविन यांनी आपले घर विकण्यासाठी चॅटजीपीटीला आपला मार्गदर्शक बनवले. त्यांनी चॅटजीपीटीवर मार्केटचा डेटा तपासून घराची अचूक व्हॅल्यू काढली. तसेच घराचे वर्णन आणि मार्केटिंग कंटेंट लिहिण्यासाठी एआयची मदत घेतली.5 / 8चॅटजीपीटीने सुचवलेले छोटेखानी बदल केल्यामुळे प्रॉपर्टीचे मूल्य लगेच वाढले. घर मार्केटमध्ये कधी आणायचे, याचा अचूक सल्लाही एआयने दिला.6 / 8या सल्ल्यामुळे घर लिस्ट केल्यावर अवघ्या ७२ तासांत लेविन यांच्याकडे ५ खरेदीदारांच्या ऑफर्स रांगा लागल्या. यामुळे एजंटला द्यावे लागणारे लाखो रुपयांचे कमिशन तर वाचलेच, शिवाय जास्तीचा नफाही मिळाला.7 / 8जरी लेविन यांनी मार्केटिंग आणि किमतीसाठी एआयचा वापर केला असला, तरी कायदेशीर कागदपत्रांच्या बाबतीत त्यांनी कोणतीही जोखीम पत्करली नाही.8 / 8'एआय तज्ज्ञांची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. त्यावर १०० टक्के विसंबून राहणे धोक्याचे ठरू शकते,' असा इशारा त्यांनी दिला आहे. म्हणूनच त्यांनी तांत्रिक कामासाठी एआय वापरले असले तरी, अंतिम करारासाठी वकिलाचाच सल्ला घेतला.