जर्मनीमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 15:53 IST2018-01-10T15:50:22+5:302018-01-10T15:53:20+5:30

मुसळधार पाऊस आणि बर्फ वितळल्यामुळे जर्मनीमध्ये पूर आणि भूस्खलनाची स्थिती उत्पन्न झाली आहे.

त्यामुळे देशातील प्रमुख नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जनजीवन लवकरच पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं आहे.

अनेक लोकांच्या गुरं बांधण्याच्या वाड्यातही पाणी भरल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.