Electric Plane: कॅब, टॅक्सीपेक्षाही कमी भाडे, जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 11:37 IST2025-06-25T11:27:24+5:302025-06-25T11:37:31+5:30

Beta Technologies Alia CX300: फक्त ६९४ रुपयांत १३० किमी प्रवास!

चारचाकी इलेक्ट्रिक कारच्या जमान्यात इलेक्ट्रिक विमान उडणार आहे, ज्याचे तिकिटही अतिशय कमी असणार आहे.

अमेरिकामधील बेटा टेक्नोलॉजीज एलिया सीएक्स ३०० कंपनीने इलेक्ट्रिक विमानाच्या उड्डाणाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

ही यशस्वी चाचणी हवाई वाहतूक क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

इलेक्ट्रिक विमानाचा यशस्वी प्रयोग करणारी अमेरिका पहिला देश ठरला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान जगभरात पोहचल्यास हवाई प्रवास खूपच स्वस्त होणार आहे.

इलेक्ट्रिक विमानाने १३० किमीच्या प्रवासासाठी फक्त ३० मिनिटांचा कालावधी लागतोय. शिवाय, प्रवाशाला ६९४ रुपयांत १३० किलोमीटरपर्यंत प्रवास करता येणार आहे.

बेटा टेक्नोलॉजीजच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात हवाई प्रवास सामान्यांसाठी अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.

यावर्षीच्या अखेरीस अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन प्रशासनाकडून (FAA) या विमानाला मंजुरी मिळेल, असे बेटा टेक्नोलॉजीज कंपनीने सांगितले.