न्यूझीलंड क्राइस्टचर्चमधील मशिदीत अंदाधुंद गोळीबार, 6 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 11:00 IST2019-03-15T10:48:49+5:302019-03-15T11:00:12+5:30

न्यूझीलंडमधील दोन मशिदींमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे, क्राइस्टचर्चमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे अचानक मशिदीत लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. हल्लेखोरांनी शिवीगाळ करत मशिदीत प्रवेश केला.
घटनास्थळावर पोहचलेल्या न्यूझीलंड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून यामध्ये 1 महिलेचाही समावेश असल्याची माहिती आहे
गोळीबार झाला त्यावेळी बांगलादेशची क्रिकेट टीम मशिदीमध्येच उपस्थित होती. सुदैवाने बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना आणि इतर उपस्थितांसह सुखरुप मशिदीबाहेर आणण्यात सुरक्षारक्षकांना यश आलं
ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा मशिदीत 300 पेक्षा अधिक लोक नमाज पठण करत होते.
गोळीबारानंतर मशिदीजवळ लोकांचे मृतदेह आणि रक्त सांडल्याचे पाहायला मिळाले