रशियातील शॉपिंग मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या विळख्यात 64 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 15:12 IST2018-03-26T15:12:06+5:302018-03-26T15:12:06+5:30

रशियातल्या सायबेरियातील केमेरोवो शॉपिंग मॉलला लागलेल्या भीषण आगीत 64 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मृतांमध्ये 11 लहान मुलांचा समावेश आहे. या आगीच्या विळख्यात अनेक जण सापडल्यानं गंभीर जखमी झालेत.
पोलिसांसह स्थानिकांनी बचावकार्य राबवत 120 जणांना वाचवलं आहे.
आग लागली त्यावेळी अनेक जण मॉलमध्ये अडकले होते.
या भीषण आगीत मॉलमधील सिनेमागृह, हॉटेल, लहान-मोठी दुकाने सर्वच जळून खाक झाली आहेत.