शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चंद्रावर वीजपुरवठा करण्यासाठी 'या' कार कंपनीने तयार केला 'न्यूक्लियर पॉवर प्लांट', पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 5:52 PM

1 / 6
Electricity on Moon: येत्या काही दशकात मानव चंद्रावर पोहोचेल, तिथे घर बांधेल. अनेक देशही तिथे स्वतःचे बेस उभारतील. पण, या सगळ्यासाठी वीज कुठून आणणार? चंद्रावरही पाणी नाही, वाराही नाही. जलविद्युत किंवा पवनउर्जा प्रकल्प उभारता येणार नाही. काही लोक सौर ऊर्जेचा पर्याय देतील, पण चंद्राच्या अंधाऱ्या भागात काय कराल?
2 / 6
जगातील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयसने याचे उत्तर शोधले आहे. चंद्रावर वीज पुरवण्यासाठी कंपनीने मिनी अणुऊर्जा प्रकल्पाचे मॉडेल तयार केले आहे. नुकतीच उत्तर आयर्लंडमधील बेलफास्ट येथे अंतराळ परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये रोल्स रॉयसने मिनी न्यूक्लियर प्लांटचे मॉडेल प्रदर्शित केले होते.
3 / 6
ही 120 इंच लांबीची मिनी अणुभट्टी असून, या प्लांटच्या माध्यमातून चंद्रावर उभारल्या जाणाऱ्या मानवी वस्तीला सतत वीजपुरवठा केला जाऊ शकतो. ही छोटी अणुभट्टी 40 इंच रुंद आणि 120 इंच लांब आहे. सध्या त्यातून वीजनिर्मिती होत नाही.
4 / 6
रोल्स रॉयसचे अभियंते आणि शास्त्रज्ञ या अणुभट्टीतून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेपासून ऊर्जा कशी काढायची, याचा शोध घेत आहेत. यूके स्पेस एजन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बेट म्हणाले की, रोल्स रॉयसचा हा उपक्रम विलक्षण आहे. यामुळे चंद्रावर मानवाला कायमस्वरुपी वीज मिळू शकते. या प्रकल्पासाठी इंग्लंडच्या स्पेस एजन्सीने रोल्स रॉयसला सुमारे 30.62 कोटी रुपयांचा निधीही दिला होता.
5 / 6
सर्व काही सुरळीत राहिल्यास किमान सहा वर्षांत या अणुभट्टीतून वीजनिर्मिती सुरू होईल. ही बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे. या मिनी अणुभट्टीत होणाऱ्या क्रियेतून वीज निर्माण होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. जगभरात अणुऊर्जा प्रकल्पांची ज्याप्रकारे स्थापना केली जाते, त्याच तंत्रज्ञानावर हीदेखील तयार करण्यात येत आहे.
6 / 6
सूर्यप्रकाश नेहमी चंद्राच्या एकाच भागावर पडतो, दुसरा भाग अंधारात राहतो. म्हणूनच, सूर्यप्रकाश हा दुय्यम पर्याय असू शकतो. मात्र सतत वीजपुरवठा करण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था असणे आवश्यक आहे. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात वीज निर्माण करता येईल अशा ठिकाणी हे अणुप्रकल्प बसवले जातील. रोल्स रॉयसने दावा केला आहे की 2030 पर्यंत ते ही मिनी अणुभट्टी तयार करतील.
टॅग्स :Rolls-Royceरोल्स-रॉईसcarकारAutomobile Industryवाहन उद्योगisroइस्रोNASAनासा