डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:43 IST
1 / 7अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुगलच्या युट्यूब प्लॅटफॉर्मच्या प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. ट्रम्प यांनी युट्यूब विरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. युट्यूबने आता यात आर्थिक भरपाई देऊन प्रकरण संपवले आहे.2 / 7युट्यूबने ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रकरणात समेट घडवण्यासाठी २४.५ मिलियन डॉलर अर्थात २१७ कोटी रुपये देण्यास होकार दिला आहे. हे प्रकरण युट्यूबवरील अकाऊंट सस्पेड करण्याशी संबंधित आहे. ट्रम्प यांनी मेटा आणि एक्स पूर्वीचे ट्विटरवरही खटला दाखल केला होता.3 / 7२०२१ मध्ये अमेरिकेच्या राजधानी मोठे आंदोलन झाले होते. अमेरिकेच्या संसदेत आंदोलक घुसले होते. हिंसक आंदोलन त्यावेळी झाले होते. या आंदोलनासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दोन सोशल मीडिया पोस्ट जबाबदार असल्याचा आरोप केला गेला होता. 4 / 7याच घटनेनंतर युट्यूब, मेटा (फेसबुक, इन्स्टाग्राम) आणि एक्स (त्यावेळचे ट्विटर) या कंपन्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स अनेक दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. या प्रकरणात ट्रम्प यांनी तिन्ही कंपन्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.5 / 7मार्क झुकरबर्ग यांच्या मेटाने या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना २५ मिलियन डॉलर इतकी भरपाई दिली होती. एक्सने (ट्विटर) १० मिलियन डॉलरची भरपाई दिली होती. त्यानंतर गुगलच्या युट्यूबविरोधातील प्रकरण सुरू होते.6 / 7आता गुगलच्या व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूब ट्रम्प यांना २४.५ मिलियन २१७ कोटी रुपये भरपाई देणार आहे. ट्रम्प यांना या प्रकरणात आतापर्यंत ६० मिलियन डॉलरपेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत.7 / 7कॅलिफोर्नियाच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, २२ मिलियन डॉलर नॅशनल मॉलच्या ट्रस्टला दिले जाणार आहेत. उर्वरित पैसे अमेरिकन कंझर्व्हेटिव्ह यूनियनसह त्या लोकांना दिले जाणार आहे, ज्यांनी हे प्रकरण लावून धरले होते.