शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प तोंडावर बोलले, जपानच्या पंतप्रधान संकोचल्या; दुसऱ्या महायुद्धातील 'पर्ल हार्बर' प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:16 IST

1 / 7
जपानच्या पंतप्रधान सनाय ताकाइची अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली आणि त्यावेळी दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. एका जपानी पत्रकाराने ट्रम्प यांना प्रश्न विचारला, 'तुम्ही इराणवर हल्ला करण्यापूर्वी युरोप आणि आशियातील तुमच्या सहकारी देशांना, जसे जपानला कार सांगितले नाही. आम्ही जपानी लोक संभ्रमात आहोत?'
2 / 7
जपानी पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर ट्रम्प अजिबात वेळ दवडता उत्तर दिले. 'बघा सगळे संकेत आधीच दिले जात नाहीत. जेव्हा आम्ही हल्ला केला, तेव्हा खूप मोठा हल्ला होता. आम्ही याबद्दल कोणालाच सांगितले नाही, कारण आम्हाला सरप्राईज द्यायचे होते. सरप्राईजबद्दल जपानपेक्षा चांगलं कोणाला माहिती आहे. मी असे विचार शकतो की, तुम्ही (जपान) आम्हाला (अमेरिका) पर्ल हार्बरच्या हल्ल्याबद्दल का सांगितले नाही. मी असे म्हणून शकतो ना, तुम्हीही सरप्राईजवर विश्वास ठेवता, कदाचित आमच्यापेक्षा जास्त.'
3 / 7
ट्रम्प यांच्या याच उत्तराने पर्ल हार्बर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले. कारण ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर झालेला हल्ला ही इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. या हल्ल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाचे स्वरूप बदलले.
4 / 7
पर्ल हार्बर हे अमेरिकेच्या हवाई बेटांवरील ओआहू बेटावर असलेले एक नैसर्गिक बंदर आहे. अमेरिकेच्या नौदलाचा पॅसिफिक महासागरातील हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा लष्करी तळ होता. जपानला संपूर्ण आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रावर आपले वर्चस्व निर्माण करायचे होते. त्यातूनच ही घटना घडली.
5 / 7
अमेरिकेने जपानच्या आक्रमक धोरणामुळे त्यांच्यावर खनिज तेल आणि इतर व्यापारी निर्बंध लादले होते. यामुळे जपानची कोंडी झाली होती. दक्षिण-पूर्व आशियावर कब्जा करताना अमेरिकेचे पॅसिफिकमधील लष्कर हा सर्वात मोठा अडथळा ठरेल. तो अडथळा एकाच फटक्यात नष्ट करण्यासाठी त्यांनी पर्ल हार्बरवर हल्ला करण्याचा कट रचला.
6 / 7
जपानने अतिशय गुप्तपणे ही मोहीम आखली होती. रविवारी सकाळी, जेव्हा अमेरिकन सैनिक विश्रांतीच्या लगबगीत होते, तेव्हाच जपानने अचानक हल्ला केला. सकाळी ७:४८ वाजता जपानने त्यांच्या विमानवाहू जहाजांवरून सुमारे ३५० पेक्षा जास्त विमाने पाठवली होती. यात फायटर जेट्स, बॉम्बर आणि टॉर्पेडो विमानांचा समावेश होता.
7 / 7
अमेरिकेच्या ८ युद्धनौका गंभीररीत्या खराब झाल्या आणि बुडाल्या होत्या. विशेषतः 'USS Arizona' ही नौका पूर्णपणे नष्ट झाली होती. सुमारे १८८ विमाने नष्ट झाली. २,४०३ अमेरिकन नागरिक आणि सैनिक या हल्ल्यात शहीद झाले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांनी या दिवसाचे वर्णन 'A date which will live in infamy' (कलंकित दिवस) असे केले होते. शेवटी या युद्धाचा अंत १९४५ मध्ये जपानवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बने झाला.
टॅग्स :Warयुद्धAmericaअमेरिकाJapanजपानwar shipयुद्ध नौका