अवघ्या जगाला एका गॉगलने खिळवून ठेवलेले; त्या रे बॅनच्या मालकाचे निधन; वाचा ब्रँडची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:23 PM2022-06-28T16:23:54+5:302022-06-28T16:27:39+5:30

खरेतर हा मालक इटलीचा असला तरी रे बॅन हा ब्रँड काही इटलीचा नाही. ही कंपनी १८ च्या शतकातली, आजही जगावर राज्य करतेय.

इटलीचे दुसरे श्रीमंत व्यक्तीमत्व आणि ज्याने अवघ्या जगाला पिढ्यानपिढ्या एका गॉगलमध्ये अडकवून ठेवले त्या रेबॅन गॉगलचे जन्मदाता लिओनार्दो डेल वेकिओ यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. वेकिओ यांच्या कंपनीने Luxottica Group ने १९९९ मध्ये रे बॅन खरेदी केली होती.

आजही सनग्लासेसच्या दुनियेत Ray-Ban सारखा मोठा आणि प्रभावी असा कोणताच ब्रँड नाही. बड्या बड्या देशांचे राष्ट्राध्यक्ष ते हिरो-हिरोईन आणि खेळाडू, कित्येक पिढ्या Ray-Ban लाच पसंती देतात.

खरेतर हा मालक इटलीचा असला तरी रे बॅन हा ब्रँड काही इटलीचा नाही. Ray-Ban च्या मूळ कंपनीचे नाव Bausch & Lomb होते. १८६३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये याची स्थापना झाली होती. ही कंपनी आयग्लासेस, मायक्रोस्कोप आणि बायनाक्युलर्स, टेलिस्कोप बनवायची. नंतर ही कंपनी फोटोग्राफिक लेन्सही बनवायला लागली.

जेव्हा पहिले विश्वयुद्ध सुरु झाले, तेव्हा Bausch & Lomb ने मिलिट्रीच्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या वाढलेल्या मागणीचा मोठा फायदा उचलला. ग्रेट वॉरवेळीही अमेरिकी सैन्याला पुरवठा करत राहीली. परंतू नंतर कंपनीच्या मार्गात एक मोठे वळण आले.

1930 मध्ये अमेरिकेच्या लष्करी पायलटनी आकाशात असताना तीव्र सूर्यकिरणांपासून डोळे वाचविण्यासाठी प्रोटेक्टिव्ह आयविअर मागितले. यावर कंपनीने गर्द हिरवे, प्लास्टिक फ्रेमच्या ग्लासेस तयार केल्या. ते टीअरड्रॉप शेपमध्ये होते आणि अँटी ग्लेअर देखील होते. 1937 मध्ये अॅव्हिएटर स्टाईल ग्लासेस लाँच केली.

अँटी ग्लेअर ग्लासेस जेव्हा सामान्यांसाठी बाजारात आणल्या गेल्या तेव्हा त्याचे नाव बदलून Ray-Ban ठेवण्यात आले. धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरणांना रोखण्यासाठी तयार झाल्याने रे बॅन असे नाव देण्यात आले.

1920 च्या दशकात, क्वचितच कोणी सनग्लासेसबद्दल ऐकले होते, परंतु 1938 मध्ये, एकट्या अमेरिकेत 20 दशलक्षाहून अधिक सनग्लासेस विकले गेले. 'एव्हिएटर' झटपट हिट झाला. यानंतर याचे आणखी काही व्हेरिएंट लाँच करण्यात आले.

१९९० च्या दशकात रे-बॅनची चमक थोडी कमी झाली. 1999 मध्ये जेव्हा Luxxotica ने Ray-Ban विकत घेतले, तेव्हा त्यांनी गॉगलची श्रेणी पुन्हा रिस्ट्रक्चर केली. रे-बॅन ही लक्झरी सनग्लासेसची आजपर्यंतची सर्वात मोठी कंपनी आहे.