मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:04 IST
1 / 7थायलंडमधील स्थानिक वेळेनुसार ९.१३ वाजता नाखोण रतचसिमा प्रांतातील नाँग नाम खूण रेल्वे स्थानकावरून रेल्वे गाडी निकाली होती. स्टेशन निघाल्यानंतर गाडीने वेग घेतला पुढच्या रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घटना घडली.2 / 7रेल्वे गाडी जात असलेल्या रेल्वेरुळावरच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. ही बुलेट ट्रेन थायलंड आणि चीन यांना जोडणारी आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू असतानाच महाकाय क्रेन रेल्वेवर कोसळले.3 / 7अचानक क्रेन कोसळल्याने रेल्वे गाडीचे डब्बे रुळावरून उलटले आणि काही डब्ब्यांनी पेट घेतला. या गाडीतून विद्यार्थी आणि ऑफिसला निघालेल्या लोकांची संख्या अधिक होती. २८ जणांचा मृत्यू झाला.4 / 7एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, क्रेनमुळे एका स्लाईस सारखी जाऊन पडली. रेल्वेतील एका कर्मचाऱ्याने सांगितले की, हा अपघात इतका भीषण होता की, मी वेगाने हवेत फेकला गेला आणि पडलो.5 / 7थायंलडमधील स्थानिक प्रशासनाने सांगितले की, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेसाठी जे जबाबदार आहेत, त्या कठोर शिक्षा करण्यात येईल, असे सांगितले.6 / 7सध्या चीन आणि थायलंड यांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे. खाली रेल्वे रुळ असून, त्यावरच उन्नत (पूल उभारून) मार्ग बुलेट ट्रेनसाठी तयार केला जात आहे.7 / 7थायलंडमधील या प्रोजेक्टमध्ये चीनची कंपनी किंवा कामगार नाहीत. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, ती थायलंडमधीलच असल्याचे चीनच्या दूतावासाने म्हटले आहे.