शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Covid-19: चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाला कोरोना; US रिपब्लिकनच्या अहवालात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 4:40 PM

1 / 9
गेल्या वर्षभरापासून या मुद्द्यावर वाद सुरू असून अखेर आज अमेरिकी रिपब्लिकननं सादर केलेल्या अहवालात चीनच्या मांस व मासळी बाजारातून व्हायरसचा प्रसार झाल्याची बाब पूर्णपणे फेटाळून लावण्यात आली आहे.
2 / 9
सप्टेंबर पूर्वीच वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमधून कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याचे पुरावे हाती लागल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यानंतर काही महिन्यांनी या संसर्गावर संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं. पण त्याआधीच त्याचा प्रसार झाला होता, असंही नमूद करण्यात आलं आहे.
3 / 9
वुहानमधील मीट मार्केटमधून (मांसविक्री बाजार) कोरोनाचा प्रसार झाल्याचं आजवर सांगण्यात येत आहे. पण हा दावा पूर्णपणे फेटाळून लावण्याची वेळ आता आली आहे. कारण व्हायरसचा उगम आणि प्रसारा संदर्भात महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
4 / 9
कोविड-१९ विषाणू वुहान वायरोलॉजी प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचे काही परिस्थितीजन्य पुरावे हाती लागले आहेत. १२ सप्टेंबर २०१९ च्या काही काळ आधीच कोरोना विषाणूचा प्रसार झालेला होता.
5 / 9
हाऊस फॉरेन अफेअर्स कमेटीचे प्रमुख रिपब्लिकन आणि टेक्सासचे प्रतिनिधी माइक मॅककॉल यांनी रिपब्लिकनच्या कर्मचाऱ्यांनी तयार केलेला अहवाल जारी केला आहे. यासोबतच त्यांनी कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबाबत चौकशी करण्यासाठी द्विपक्षीय तपास करण्यासाठी आवाहन देखील केलं आहे.
6 / 9
वुहानच्या प्रयोगशाळेत सुरक्षे संदर्भातील नियमांमध्ये कमतरता होती. जुलै २०१९ मध्ये वेस्ट ट्रीटमेंट सिस्टमच्या निर्मितीसाठी १.५ मिलिअन डॉलरची मागणी केली गेली होती. यात वुहानच्या प्रयोगशाळेत वैज्ञानिक कोविड विषाणू माणसात संक्रमित करण्यासाठीचा त्यात बदल करण्याचा प्रयत्न करत होते. तसंच याची माहिती कशी दडवता येईल याचेही पुरेपूर प्रयत्न केले गेले, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
7 / 9
वुहान प्रयोगशाळेला अमेरिका आणि चीन अशा दोन्ही सरकारांकडून पैसा मिळत होता. अमेरिकेचे संसर्स रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनीही वुहानमधील प्रयोगशाळेला हजारो डॉलर्सची मदत केल्याचं मान्य केलं होतं.
8 / 9
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही देशाच्या गुप्तचर यंत्रणेला कोरोना विषाणूचं उगमस्थान शोधून काढण्याची जबाबदारी दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) विशेष पथकानं विषाणू संदर्भात माहिती घेण्यासाठी चीनचा दौरा केला होता.
9 / 9
चीनच्या वुहानमध्येच डिसेंबर २०१९ मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. पण डब्ल्यूएचओच्या पथकानं वुहानमध्ये केलेल्या तपासानंतर कोविड-१९ विषाणू नैसर्गिकरित्या निर्माण झाला असून जनावरांपासून तो माणसापर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट केलं होतं. पण अमेरिकेनं याबाबत संशय व्यक्त केला होता.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनCorona vaccineकोरोनाची लस