coronavirus: कोरोनाविरोधात रशियाचे अजून एक पाऊल पुढे! या आठवड्यापासूनच लस उपलब्ध होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 13:52 IST
1 / 6कोरोना विषाणूच्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या फैलावामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी रशियाने कोरोनाविरोधातील लस विकसित केल्याचा दावा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 2 / 6आता रशियाने अजून एक खुशखबर दिली आहे. नागरिकांना या आठवड्यापासूनच कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे रशियाने सांगितले आहे. 3 / 6रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या आठवड्यापासून कोरोना विषाणूविरोधातील स्पुटनिक V ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. ही लस रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी लाँच केली होती. 4 / 6 रशियन वृत्तसंस्था TASS ने रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमधील डेप्युटी डायरेक्टर डेनिस लोगुनोव्ह यांचया हवाल्याने सांगितले की स्पुटनिक V या लसीचा आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर व्यापक प्रमाणात उपयोग केला जाईल. आरोग्य मंत्रालय या लसीची चाचणी घेणार आहे. त्यासाठी आम्ही लवकरच परवानी घेऊ. 5 / 6त्यांनी सांगितले की सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध करून देण्याची एक निश्चित प्रक्रिया आहे. १० ते १३ सप्टेंबरदरम्यान नागरिकांच्या वापरासाठी कोरोनावरील लसीची परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना लस दिली जाईल. 6 / 6कोरोनावरील ही लस मॉस्कोमधील गमलेया रिसर्च इंस्टिट्युटने रशियन आरोग्य मंत्रालयासोबत मिळून एडेनोविषाणूला बेस बनवून तयार केली आहे. या लसीच्या दोन चाचण्या ह्या या वर्षी जून-जुलैमध्ये करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ७६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. ही लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात १०० टक्के अँटीबॉडी विकसित झाल्या होत्या.