CoronaVirus : कोरोनाच्या संकटात 'हे' रोगसुद्धा ठरतायत बर्‍याच देशांसाठी डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 01:35 PM2020-05-12T13:35:23+5:302020-05-12T13:58:22+5:30

संपूर्ण जग कोरोना या महारोगराईचा सामना करत आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संक्रमणाच्या काळातही काही देशांना इतर विषाणूंच्या साथीच्या आजारांचाही सामना करावा लागत आहे.

या सर्व गोष्टींमुळे सर्वच देशांच्या आरोग्य यंत्रणांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. कोणत्या देशांना कोरोना आणि इतर संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोरोनासह इंडोनेशियामध्ये डेंग्यूनंही हाहाकार माजवला आहे. यावर्षी इंडोनेशियात केवळ 40,000 लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे हे प्रमाण 16 टक्के जास्त आहे. येथे कोरोनाच्या रुग्णांना रुग्णालयात अधिक प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे डेंग्यूसारख्या अनेक गंभीर रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

अमेरिकेच्या या भागात परिस्थिती अतिशय वाईट आहे. येथे 2019मध्ये डेंग्यूच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या, ज्या 2020मध्ये वाढत आहेत.

अर्जेंटिनामध्ये कोरोना विषाणूपेक्षा डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूने ग्रासलेला ब्राझील आता कोरोना विषाणूचं पुढील केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, याविषयी तज्ज्ञांनाही चिंता आहे.

सीडीसी (रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे)च्या अहवालानुसार सिंगापूर, फिलिपिन्स, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळमध्येही डेंग्यूचे प्रकार वाढत आहेत.

मध्य आफ्रिकेतस्थित रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक आहे. येथे 2018पासून इबोलाची प्रकरणे येऊ लागली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, यावर्षी एप्रिलपासून येथे पुन्हा एकदा इबोलाची प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. अहवालानुसार आतापर्यंत इबोलाची 3500हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोनाबरोबरच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्येही आफ्रिकन स्वाइन फिव्हरचा प्रादुर्भाव होत आहे. हा अतिसंसर्गजन्य आहे. 2018मध्ये हा विषाणू आशियापासून पसरला, ज्यामुळे डुकरांची लोकसंख्या काही देशांमध्ये 10 टक्क्यांनी कमी झाली.

मेक्सिको आणि बुरुंडी या दोन्ही देशांना गोवरच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागला आहे, तर सौदी अरेबियादेखील कोरोना व्यतिरिक्त MERS (मिडल इस्ट रेस्पिरी सिंड्रोम)चाही सामना करत आहे. कोरोना व्हायरसचा धोका केवळ मानवांनाच नाही, तर जगभरातील प्राण्यांवरही पसरला आहे.

अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनामधील अधिका-यांनी पुष्कळ टर्की पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू)ची लागण झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. जर हा आजार पसरला असेल तर पोल्ट्री फार्मसाठी ती खूप वाईट बातमी ठरणार आहे, कारण कोरोनाच्या कारणामुळे हा उद्योग आधीच तोट्यात आहे.

2014 आणि 2015 मध्ये अमेरिकेच्या 15 राज्यांत व्हायरस पसरण्याच्या भीतीने 500 दशलक्षांपेक्षा जास्त कोंबड्यांची आणि टर्की पक्षी मारून टाकण्यात आले. त्याच वेळी बहुतेक देशांनी संसर्ग टाळण्यासाठी अमेरिकन कोंबडी आणि टर्की पक्ष्यावर बंदी घातली.

इथिओपिया कोरोनासमवेत पिवळा तापाची समस्या सतावत आहे. तिथल्या सरकारनं कोरोना टाळण्यासाठी घरीच राहण्याचे सुचविले आहे, तर इथले लोक पिवळ्या तापाची लस घेण्यासाठी रुग्णालयात जात आहेत. गेल्या महिन्यात येथे या तापातून चार लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरीच नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.