CoronaVirus: 173 वर्षांपूर्वीच्या 'कर्जा'ची परतफेड, कोरोना पीडितांना पैसे पाठवून मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 01:35 PM2020-05-06T13:35:16+5:302020-05-06T13:43:47+5:30

अमेरिकेला कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत कोरोनानं १२ लाखांहून अधिक लोक संक्रमित असून, मृतांचा आकडाही 71 हजारांहून अधिक आहे.

. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटाचा सामना करत असलेल्या अमेरिकी लोकांना 173 वर्षांपूर्वी केलेल्या मदतीचा आता मोबदला मिळत आहे.

1847मध्ये नेटिव्ह अमेरिकेच्या Choctaw Nationने आयर्लंडमधील लोकांना ग्रेट पोटॅटो हा साथीचा रोग सर्व देशात पसरलेला असताना 170 डॉलर्सची मदत पाठविली होती.

ही रक्कम आज स्वरुपात पाहिल्यास सुमारे 5000 डॉलर्स (3.7 लाख रुपये) होते. आयर्लंडमधील ज्या लोकांना 173 वर्षांपूर्वी मदत मिळाली होती, आता तेच लोक मूळ अमेरिकन समुदायाला कोरोनाच्या संकटात मदतीच्या स्वरूपात पैसै पाठवत आहेत.

अमेरिकेत कोरोनानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला असल्यानं तिथले लोक त्रासलेले आहेत.

अमेरिकेच्या Navajo Nation क्षेत्रात 3 मेपर्यंत कोरोनामुळे कमीत कमी 73 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 2373 लोकांना या विषाणूची लागण झाली होती.

time.comच्या अहवालानुसार, नवाजो प्रांतातील 40 टक्के घरात पाणीपुरवठा बंद आहे आणि 10 टक्के लोकांकडे वीज नाही. मदतीसाठी तिथल्या लोकांनी क्राउडफंडिंग वेबसाइट असलेल्या GoFundMeवर एक मोहीम सुरू केली आहे.

जिथे आतापर्यंत मदतीच्या स्वरूपात 23 लाख डॉलरची रक्कम प्राप्त झाली आहे. या मदतीमध्ये आयर्लंडचा मोठा वाटा आहे.

असं म्हणतात की, आयर्लंडमधील लोक 1847मध्ये मूळ अमेरिकेने दिलेली मदत कधीच विसरलेले नाहीत.

2017मध्ये आयर्लंडच्या काऊन्टी कॉर्कमध्ये Kindred Spirits नावानं 9 शिल्पचित्रं ठेवण्यात आली होती.

2018मध्ये आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर यांनी नावाजो राष्ट्राच्या लोकांसाठी शिष्यवृत्तीची घोषणा केली होती, जेणेकरून दोन समुदायातील लोक एकत्र येतील.

आम्हाला तुमच्या लोकांनी केलेली मदत आम्ही कधीही विसरणार नसल्याचंही लिओ वराडकर यांनी सांगितलं आहे.